एक्स्प्लोर

Mumbai Crime : लहान मुलांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दीड-दोन लाखांसाठी मुलांची विक्री; सहा जणांना अटक

Mumbai Children Kidnapping : दोन वर्षाच्या मुलासाठी दीड ते दोन लाख रुपये या आरोपींना मिळायचे अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. 

मुंबई: फुटपाथवर राहणाऱ्या वाघरी कुटूंबातील लहान मुलांना चोरून त्यांची विक्री (Mumbai Children Kidnapping) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबईच्या मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून या सहा आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मुंबईचा कुरार पोलिसांनी (Mumbai Police) ही कारवाई केली. या आरोपींनी मुंबईत किती लहान मुलांना पळवले आहे आणि या टोळीमध्ये आणखी किती सदस्य आहे या संदर्भात आता कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही टोळी मुलांची तस्करी करणाऱ्या एका बड्या रॅकेटचा भाग असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुले नसणाऱ्या नागरिकांना लहान मुले विकण्याचे काम या टोळीकडून सुरू होते. एक-दीड वर्षाच्या मुलासाठी खरेदीदाराकडून दीड ते दोन लाख रुपये या मुले चोरणाऱ्या टोळीला मिळतात अशी माहिती समोर आली आहे. इरफान फुरखान खान (26 वर्षे), सलाहुद्दीत नुरमोहम्मद सय्यद (23 वर्षे), आदिल शेख खान (19 वर्षे), तौफिर इक्बाल सय्यद (26 वर्षे), रझा अस्लम शेख (25 वर्षे) आणि समाधान जगताप अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, आरोपी डॉक्टरला बेड्या 

इन्स्टाग्रामवरून (Instagram) ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांनी (Malvani Police) अटक केली आहे. सदरच्या आरोपीने या महिलेकडून सोनं आणि पैसेही उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच याशिवाय इतरही महिलांशी त्याचे संबंध असून त्यांनाही लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचं समोर आलं आहे. योगेश सुनील भानुशाली (33 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्या विरोधात आतापर्यंत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत. 

आरोपी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून (Instagram) तरुणींना लग्नाच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून नंतर बलात्कार करून फोटो आणि व्हिडीओ काढायचा. त्यानंतर त्याचा वापर करून त्या तरुणींना ब्लॅकमेल करत होता. या तरुणींकडून आरोपीने पैसे आणि दागिणे उकळले होते.

या आरोपीने आणखी एका महिलेला त्याच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं. तिच्याकडूनही पैसे आणि दागिणे घेतले होते. आरोपीवर मालवणी पोलीस ठाण्यात 2020 मध्ये पोक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. त्यासंबंधित दोषारोप ठेवण्यात आला असून न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. मालवणी पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget