एक्स्प्लोर

मोठी बातमी : घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू

Who is Bhavesh Bhinde : घाटकोपर दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Accident) आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) फरार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.  घाटकोपर दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता. (Who is Bhavesh Bhinde responsible for Ghatkopar Hoarding Falls)

आरोपी भावेश भिंडे फरार

मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणात भावेश भिंडे आरोपी असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेल्या 88 जण जखमी झाले आहेत. 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

घाटकोपरमधील पंतनगर येथील पेट्रोल पंपावर 120 बाय 120 आकाराचा मोठा होर्डिंग कोसळला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या प्रकरणात आरोपी भावेश भिंडे सह इतर काही जणांवर 304, 338, 337, 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध सुरु असून तो सध्या फरार असल्याचं समोर आलं आहे. भावेश भिंडे कुटुंबासह गायब झाला आहे. 

कोण आहे भावेश भिंडे? (Who is Bhavesh Bhinde)

भावेश भिंडे हा इगो मीडियाचा संचालक आहे. याच मीडिया कंपनीचं हे होर्डिंग होतं. यामुळे त्याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2009 मध्ये भावेश भिंडेने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर 26 गुन्हे दाखल असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विनापरवाना साईन बोर्ड लावल्याप्रकरणी भावेश भिंडेवर हे गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

22 वर्षीय मुलीच्या लग्नाची इच्छा अपूर्ण, पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंडSurendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावाABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Embed widget