एक्स्प्लोर

Pappu Yerunkar : चुनाभट्टी परिसरात गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, दिवसाढवळ्या 16 राऊंड फायर, एकाचा मृत्यू, चार जखमी

Mumbai Chunabhatti Firing News : अंतर्गत वादातून स्थानिक गुंड पप्पू येरुणकर आणि त्याच्या दोन ते तीन साथिदारांवर गोळीबार करण्यात आला आहे. 

Mumbai Chunabhatti Firing News : मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकरवर (Pappu Yerunkar) गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंतर्गत वादातून पप्पू येरुणकरवर हा गोळीबार करण्यात आला आहे. त्याच्यासोबत इतर चार लोकांवरही गोळीबार करण्यात आला. जखमींना सध्या सायन रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. 

चुनाभट्टीतील आझाद गल्ली परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी 16 राऊंड फायर करण्यात आले आहेत. येरुणकर सोबत इतर तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. या गजबजलेल्या परिसरात सध्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. 

अंतर्गत वादातून हल्ला

पप्पू येरुणकर हा स्थानिक गुंड असल्याची माहिती असून त्याच्यावर अंतर्गत वादातून हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पप्पू येरुणकर याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून तो याआधी तुरुंगातही जाऊन आला आहे. तसेच त्याचे अनेक लोकांसोबत जुने वाद आहेत. त्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

गोळीबार झालेल्या व्यक्तींची नावं

(1) सुमित येरुणकर वय 46 वर्ष- याच्या पोटाला व डाव्या खांद्याला अशा दोन गोळया लागल्या आहेत.(मयत )
(2) रोशन निखिल लोखंडे वय 30 वर्ष. याच्या उजव्या मांडीला एक गोळी लागली आहे.
(3) मदन पाटील वय 54 वर्ष, यांच्या डाव्या काखेत एक गोळी लागली आहे.
(4) आकाश खंडागळे,  वय 31 वर्ष, याच्या उजव्या हाताच्या दंडावरती एक गोळी लागली आहे.
(5) त्रिशा शर्मा,  वय 8 वर्ष, हिच्या उजव्या हाताला गोळी लागली आहे.

ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण हे अत्यंत गजबजलेलं आहे. या परिसरात अनेक दुकानं असून त्या ठिकाणच्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्य या घटनेमुळे चुनाभट्टी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special ReportZero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget