एक्स्प्लोर

Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?

Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला फसवताना आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत शेकडो खाती उघडली आहेत. त्याचा तपास केला जाणार आहे.

मुंबई : मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्टच्या (Digital Arrest) नावाखाली 58 कोटींना फसवण्यात आलं, या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास 9 वेगवेगळ्या टीम काम करत आहेत. लवकरच याच्या मुळाशी आम्ही पोहोचू असा विश्वास सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव (Yashasvi Yadav IPS) यांनी व्यक्त केला. डिजिटल अरेस्ट अशी काही संकल्पनाच कोणत्या कायद्यात नाही, असं जर कुणी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन यशस्वी यादव यांनी केलं.

IPS Yashasvi Yadav On Digital Arrest :काय म्हणाले यशस्वी यादव?

अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव म्हणाले की, "फसवणूक झालेले पीडित हे देशातल्या मेडिकल क्षेत्रातले नामवंत व्यक्ती आहेत. त्यांच्या पत्नी बँकिंग क्षेत्रात 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. सायबर भामट्यानी या वयोवृद्ध दाम्पत्याला फसवलं आणि कोट्यवधी रुपये उकळले. या जोडप्याला जवळपास 40 दिवस मानसिक त्रास दिला गेला. दर दोन तासाला ते काय करतायत, कुठे आहेत याची माहिती घेतली जात होती."

पीडितांना पटवून दिल की डिजिटल अरेस्ट केली जात आहे आणि त्यांच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे. आरोपींनी बनावट कोर्ट उभे केलं. त्यात जज, वकील आणि साक्षीदारही बनवले. पोलीस स्टेशनचा सेटअप बनवण्यात आला होता. देशातल्या सर्वात मोठ्या डिजिटल अरेस्ट केसमधली ही आहे. त्यांच्या मित्रापैकी कोणीतरी सायबर स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला, तरीही 11 दिवस ते आले नाहीत. यात 11 दिवस वाया गेले होते. 12 ऑक्टोबरला ते आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली.

या घोटाळ्यात जवळपास 6500 बँक अकाउंटचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. या सगळ्यात बँकिंग व्यवस्था मुख्य आरोपी आहे. बँकांनी खाते ओपन करताना ग्राहकाची सर्व माहिती आणि केवायसी नियमलवलीचे पालन करायला हवं. या केसमध्ये खाते ओपन करणे अवघड नव्हते असे समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी शेकडो खाती उघडली आहेत. आरबीआयला आम्ही विनंती करतोय त्यांनी यात सुधारणा करावी.

सायबर भामट्यानी त्यांना 40 दिवसात 26 वेळा बँकेत पाठवून हे पैसे पाठवून घेतले. बँकेत 10 पेक्षा अधिक वेळा जर सिनियर सिटीझन गेल्यावर बँकिंग क्षेत्रातील अनुभवी लोकांना हे कळायला हवं होतं. पण हा निष्काळजीपणा आहे की संगनमत आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत. आम्ही यावर्षी 3 हजार लोकांना डिजिटल अरेस्टमध्ये बळी पडण्यापासून रोखलं आहे.

शेख शहीद अब्दुल सलाम, जफर सईद, इम्रान शेख आणि मोहम्मद नावेद शेख यांच्यासह आणखीन तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून आतापर्यंत 4 कोटी हस्तगत करण्यात आले आहेत. येत्या काळात अजून आम्ही रक्कम हस्तगत करणार आहोत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जवळपास 9 टीम कार्यरत आहेत.

ही बातमी वाचा:

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Embed widget