एक्स्प्लोर

Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती

Digital Arrest Fraud Detail : डिजिटल अरेस्टमध्ये भामटे हे आपण पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम अधिकारी असल्याचं भासवून पैसे उकळतात. त्यावर नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची याची सविस्तर माहिती.

Digital Arrest : गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्ट हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतो. त्या माध्यमातून देशभरात अनेक लोकांना लाखो-कोट्यवधींचा गंडा घातल्याचं दिसत आहे. नुकतंच नाशिकमधील एका ज्येष्ठ नागरिकाला 6 कोटींना फसवलं, त्या आधी मुंबईतील एका महिलेकडून डिजिटल अरेस्टच्या नावाने तब्बल 8 कोटी रुपये उकळण्यात आले. त्यामुळे डिजिटल अरेस्ट या फ्रॉडच्या नव्या प्रकाराला अनेकजण बळी पडत आहेत.

आपल्या आजूबाजूच्या फसवणुकीच्या घटना पाहताना हा प्रश्न पडतो की पोलिसांना अशा पद्धतीने डिजिटल अरेस्ट करण्याचे अधिकार आहेत का? हे डिजिटल अरेस्ट नेमकं काय? फसवणुकीसाठी ठग नेमकी कोणती पद्धत वापरतात? अशा फसवणुकीला बळी पडल्यास तात्काळ काय करावे? सायबर पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये डिजिटल अरेस्टबद्दल नेमकं काय म्हटलं आहे? या सर्व गोष्टींची सोपी आणि मुद्देसूद माहिती आपण घेऊयात.

What Is Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय?

डिजिटल अरेस्ट हा कायदेशीर शब्द नाही, तर फसवणुकीची एक नवी पद्धत आहे. असे व्हिडीओ कॉल करणारे भामटे स्वतःला पोलीस अधिकारी, CBI, ED अधिकारी, कस्टम्स अधिकारी किंवा न्यायाधीश असल्याचं भासवतात. तुम्हाला डिजिटली अटक करण्यात आलं असून तुम्ही फोन कट करु शकत नसल्याचं सांगत ते भीती घालतात. तुमच्यावर वेगवेगळे आरोप असल्याचं सांगत तुमच्याकडून पैसे उकळतात.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. अशा पद्धतीने व्हिडीओ कॉलवर अटक किंवा ताबा हा बनावट प्रकार आहे, ते बेकायदेशीर असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे. अटक ही नेहमी विधिसंमत प्रक्रिया, लेखी आदेश, वॉरंट आणि प्रत्यक्ष ताब्यात घेण्यानेच होते असं I4C च्या सूचनेत स्पष्ट केले आहे.

Digital Arrest Modus Operandi : फसवणुकीची पद्धत कशी असते?

हुक कॉल किंवा मेसेज: तुमचे पार्सल ड्रग्जसह पकडले आहे, KYC अपडेट नाही, तुमच्या SIMवरुन अश्लील व्हिडव्हायरल झाले आहेत, किंवा तुमच्या अकाउंटवरून बँकेचा मोठा घोटाळा झाला आहे अशा पद्धतीची भीती घातली जाते आणि डिजिटल अरेस्ट केली जाते.

नकली ओळख किंवा डीपफेक: अधिकारी किंवा न्यायाधीश म्हणून खोटी ओळख सांगत, कधी कधी डीपफेक क्लिप्स, आयडी कार्ड्सच्या माध्यमातून भीती घातली जाते.

भीती दाखवून पैशांची उकळणी: नाव उघड करायचे सल्यास जामीन किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे मागितले जातात. UPI किंवा पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते.

ऑन कॉल ठेवणे: फोन कट करू नका, बाथरूमपर्यंत फोन चालू ठेवा, कुणाशी संपर्क करू नका अशी तंबी दिली जाते. ते डिजिटल अरेस्ट म्हणतात.

Digital Arrest Video Call : असा कॉल आला तर तात्काळ काय कराल?

1. कॉल कट करा- व्हॉट्सअ‍ॅप, स्काईप, टेलिग्राम व्हिडओ कॉलवर कुणालाही अटक करता येत नाही.

2. काहीही पैसे, OTP, खाते तपशील देऊ नका.

3. नंबर ब्लॉक करा आणि फोनवरील स्क्रीन रेकॉर्ड, स्क्रीनशॉट पुरावा म्हणून ठेवून द्या.

4. ताबडतोब 1930 (National Cyber Helpline) या नंबरवर कॉल करा.

5. cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदवा (NCRP).

6. बँकेला ‘हॉटलिस्ट/होल्ड’ विनंती द्या, UPI किंवा नेटबँकिंग मर्यादा कमी करा.

7. स्थानिक पोलिस ठाण्यात पुरावे (कॉल लॉग, स्क्रिनशॉट, ट्रान्झॅक्शन) घेऊन जा.

8. कुटुंबातील व्यक्तींना किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांना सांगा - फसवणूक करणारे 'कोणाशी बोलू नका' असे नेहमी सांगतात. त्यांनी जर असं सांगितलं तर ते फ्रॉड आहेत हे ओळखा.

Digital Arrest Scam Prevention : फसवणूक झालीच तर काय करणार?

अशा पद्धतीने फसवणूक झालीच तर नॅशनल सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वर तक्रार द्या. त्यानंतर बँकांमध्ये फ्रीझ प्रक्रिया जलद सुरू होते. त्यामुळे अनेक प्रकरणात रक्कम अंशतः परत मिळाल्याची उदाहरणे आहेत.

NCRP वर तक्रार नोंदवताना संपूर्ण तपशील, UPI ID, अकाउंट नंबर, ट्रान्सफर वेळ, कॉल रेकॉर्ड अपलोड करा.

Provisions For Digital Arrest : कायद्यात काय तरतुदी?

डिजिटल अरेस्ट हा स्वतंत्र गुन्हा म्हणून परिभाषित नसला तरी खालील कलमे नेहमी लागू होतात,

  • माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000
  • कलम 66C ओळख चोरी, इम्पर्सोनेशनसाठी साधनांचा वापर.
  • कलम 66D कॉम्प्युटर/कम्युनिकेशन डिव्हाइस वापरून इम्पर्सोनेशनद्वारे फसवणूक (व्हिडिओ/व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर अधिकारी बनणे).
  • भारतीय न्याय संहिता (BNS), 2023
  • कलम 318 फसवणूक (Cheating).
  • कलम 319 व्यक्ती बनून फसवणूक (Cheating by personation).
  • कलम 351 गुन्हेगारी धमकी (Criminal intimidation).
  • कलम 308 खंडणी/एक्स्टॉर्शन (भीती दाखवून पैसे उकळणे).

Cyber Scam Prevention : महाराष्ट्र सायबरकडून नागरिकांसाठी सूचना

  • Digital arrest ही बनावट संकल्पना आहे, अशा कॉल्सना बळी पडू नका.
  • संशयास्पद कॉल, व्हिडओ कॉल लगेच कट करा. 1930 वर कॉल करा आणि cybercrime.gov.in वर तक्रार करा.
  • कधीही पैसे ट्रान्सफर, OTP, स्क्रीन-शेअर करू नका.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget