मुंबईत सेवानिवृत्त पोलिसाच्या घरी चोरी, मौल्यवान दागिन्यांसह 32 बोअरचं पिस्तुल, 5 जिवंत काडतुसं लंपास
Mumbai Crime News : मुंबईतील कुर्ला येथे सेवानिवृत्त पोलिसांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.
Mumbai Crime News : मुंबईतील नेहरूनगर परिसरात सेवानिवृत्त पोलिसांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला (Mumbai Kurla Crime News) येथील कामगारनगर परिसरात ही घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या उपचारांसाठी मुलाच्या घरी वास्तव्यास असल्यानं सेवानिवृत्त पोलिसांचं घर बंद होतं. हिच संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
सेवानिवृत्त दिगंबर काळे हे कुर्ला (Kurla) कामगारनगर, संगो बर्वे मार्ग येथे राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांची पत्नी आजारी असल्यानं तिच्यावर परळ (Parel) येथे उपचार सुरू आहेत. म्हणून परळ येथील मुलाच्या घरीच पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले दिगंबर काळे राहत होते. त्यामुळे त्यांचं कुर्ला येथील राहत्या घराला गेल्या काही दिवसांपासून टाळा होता. हिच संधी साधत पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी काळे यांच्या घरात चोरीचा बेत आखला आणि तो यशस्वीही केला.
घरफोडी वेळी काळे यांच्या घरातून चोरांनी लाखो रुपयांच्या मौल्यवान दागिन्यांसह अंबरनाथ शस्त्रगार कंपनीतून तयार केलेली 32 बोअरची पिस्तुलं आणि 5 जिंवत काडतुसही चोरली आहेत. चोरट्यांनी तब्बल 17 तोळे सोनं आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काळे यांच्या घरातून चोरलेल्या खासगी पिस्तुलीचा आरोपी गैरवापर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पोलीस अनोळखी आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करत आहेत. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याता आला आहे. नेहरू नगर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :