भयंकर! पती-पत्नीच्या भांडणातून सहा मुलांची हत्या, महाड हादरलं
Raigad Mahad Crime News : रायगड जिल्ह्यातील महाड येथे पती पत्नीच्या भांडणातून महिलेने सहा मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याचे समोर आले आहे.
![भयंकर! पती-पत्नीच्या भांडणातून सहा मुलांची हत्या, महाड हादरलं Raigad Mahad Crime News husband wife Argument six child dead भयंकर! पती-पत्नीच्या भांडणातून सहा मुलांची हत्या, महाड हादरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/9bc94dc40d981f9eb73e6da9f14b982b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raigad Mahad Crime News : रायगड जिल्ह्यातील महाड येथे पती पत्नीच्या भांडणातून महिलेने सहा मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये, दीड वर्षीय चिमुरडी समवेत सहा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
चिखुरी साहनी हा पत्नी आणि सहा मुलांसोबत महाड तालुक्यातील शेलटोली येथे राहत होता. चिखुरी हा बिगारी काम करायचा तर पत्नी रुणा ही गृहिणी होती. दरम्यान, चिखुरी हा दारू पिऊन पत्नीची छळवणूक करीत असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास पती पत्नीचे भांडण झाले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रुणा हिने बोरगाव येथील विहिरीत पाच मुली आणि तीन वर्षीय लहान चिमुरड्याना विहिरीत फेकण्यात आले होते. तर, दुपारी तीनच्या सुमारास रुणा हिने या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यावेळी, पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली असता अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुलकुमार झेंडे ह्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, पती पत्नीच्या या भांडणात रोशनी (10 वर्षे), करिष्मा (8 वर्षे) , रेश्मा (5 वर्षे) , विद्या (4 वर्षे) , शिवराज (3 वर्षे) , राधा (3.5 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा :
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश
UPSC Success Story : नाशिकच्या पोरानं नाव काढलं! अक्षयचं 'अक्षय्य' यश; अक्षय म्हणतो, आता फक्त आई-वडिलांना घट्ट मिठी मारायचीये
MPSC : सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर, सुधाकर कोरे आणि राहुल मातकर यांची बाजी
लालपरी आता नव्या रूपात; एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' 1 जूनपासून धावणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)