एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Mumbai Crime : सीबीआयने सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पोबारा, सीजीएसटी अधीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

सीबीआय अधिकाऱ्यांनी सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पळून गेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime : सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांनी सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पळून गेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईतील (Mumbai) अँटॉप हिल पोलिसात सीजीएसटी अधीक्षक, एक सराफ आणि कर्मचारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने पळून गेलेल्या तिघांचा शोध सुरु केला आहे.

लाच प्रकरणी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपये दिले होते. सीजीएसटीचे अधीक्षक धीरेंद्र कुमार, अँटॉप हिल इथला ज्वेलर अमृतलाल शांखला आणि त्याचा कर्मचारी बबन हे पैसे घेऊन पळाले. एजन्सीकडून त्यांचा शोध सुरु आहे. अमृतलाल शांखला हा अँटॉप हिल परिसरात असलेल्या मुकेश ज्वेलर्सचा मालक असून बबन त्यांच्या दुकानात काम करतो.

अँटॉप हिल पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, धीरेंद्र कुमार हा चर्चगेट इथल्या सीजीएसटी आयुक्तालयाच्या कर चोरी विभागात अधीक्षक म्हणून तैनात होता. धीरेंद्र कुमारच्या वतीने लाचेची रक्कम गोळा करणारे ज्वेलर अमृतलाल शांखला आणि त्याचा कर्मचारी बबन सीबीआयने तक्रारदाराला दिलेली रक्कम घेऊन पसार झाले. एजन्सीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी पळ काढला आणि त्यांचा शोध सुरु आहे. 

अटक न करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी

या प्रकरणातील व्यापारी हा सोन्याची खरेदी-विक्री करतो आणि तो कांदिवली इथे राहतो. त्याच्या एका मित्र म्हणजेच या प्रकरणातील तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार नोंदवली होती. यामध्ये तक्रारदाराने दावा केला होता की, "मला व्यापाऱ्याचा व्हॉट्सअॅप कॉल आला होता. श्री बुलियन आणि इतर कंपन्यांशी संबंधित प्रकरणात आपण चर्चगेटमधील सीजीएसटी ऑफिसमधील सीजीएसटी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचं सांगितलं. करचुकवेगिरी प्रकरणात अटक न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली आहे." परंतु एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणं कठीण असल्याचं सांगितलं. त्यानंतर सीजीएसटी अधीक्षकाने लाचेची रक्कम एक कोटींवरुन 80 लाख रुपये केली. त्यानंतर ती आणखी कमी करत 50 लाख रुपयांवर आणली. ही रक्कम दोन हफ्त्यांमध्ये देण्याचं ठरलं. त्यानंतर लाचेचा पहिला हफ्ता 25 लाख रुपये 20 एप्रिल रोजी चर्चगेटमधील कार्यालयात देण्याचं ठरलं तर दुसरा हफ्ता दुसऱ्या दिवशी देणार असं निश्चित झालं.

सीबीआयने सापळा रचला, 25 लाख रुपये गोळा केले, पण...

परंतु व्यापाऱ्याला लाचेची रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने म्हणजेच त्याच्या मित्राने सीबीआयकडे संपर्क साधला आणि व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअॅप कॉल्सचे पुरावे सादर करत तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या आरोपांची पडताळणी करुन सापळा रचला. त्यानुसार सीबीआयने 25 लाख रुपयांची रक्कम जमा केली. सीजीएसटी अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार, लाचेच्या रकमेचा पहिला हफ्ता राखाडी-निळ्या रंगाची बाईक घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीला देण्यात आला. त्या व्यक्तीने सीजीएसटी अधिकाऱ्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारली आणि पण सीबीआय अधिकारी त्याला पकडण्याआधीच त्याने तिथून पळ काढला.

सीजीएसटी अधीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान करचोरी प्रकरण श्री बुलियनशी संबंधित असल्याचं आणि ते धीरेंद्र कुमार याच्याकडे प्रलंबित असल्याचं तपासात उघड झालं आहे. यानंतर सीबीआयने धीरेंद्र कुमारच्या घरी तपास केला असता तो तिथे आढळला नाही, शिवाय त्याचा मोबाईल फोन देखील बंद असल्याचं आढळलं. यानंतर सीबीआय सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि लाचखोरीशी संबंधित व्यक्तींची ओळख पटवली. अमृतलाल शांखला आणि त्याचा कर्मचारी बबन याने धीरेंद्र कुमारच्या वतीने पैसे गोळा केले होते. धीरेंद्र कुमार, अमृतलाल शांखला आणि त्यांचा कर्मचारी बबन यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget