एक्स्प्लोर

Mumbai Crime : लालबागमध्ये आईचा खून केल्यानंतर मुलीने सुमारे 100 परफ्यूम आणि एअरफ्रेशनर खरेदी केले होते, चौकशीत माहिती समोर

Mumbai Crime : आईच्या हत्येनंतर रिंकल जैन या तरुणीने लालबाग इथल्या मेडिकल स्टोअरमधून सुमारे 100 परफ्युमच्या बाटल्या आणि एअर फ्रेशनर खरेदी केले होते.

Mumbai Crime : मुंबईतील लालबागमध्ये (Lalbaug) आपल्याच आईची हत्या करणाऱ्या मुलीची मुंबई पोलीस (Mumbai Police) चौकशी करत असून चौकशीदरम्यान तिने आणखी धक्कादायक माहिती दिली आहे. मृत महिलेचं नाव वीणा जैन आहे आणि तिचा खून करणाऱ्या मुलीचं नावं रिंकल जैन आहे. चौकशीत रिंकलने सांगितलं की, आईच्या हत्येनंतर तिने लालबाग इथल्या मेडिकल स्टोअरमधून सुमारे 100 परफ्युमच्या बाटल्या आणि एअर फ्रेशनर खरेदी केले होते.

खून केल्यानंतर काही वेळाने मृतदेह कुजायला सुरुवात होईल आणि त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या लोकांना सावध करु शकते याची तिला कल्पना होती. स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपी मुलीने त्याच परिसरातील एका मेडिकल शॉपमधून सुमारे 100 परफ्यूम आणि एअर फ्रेशनर खरेदी केले होते, ज्याचा वापर तिने दुर्गंधी कमी करण्यासाठी केला होता, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

आरोपी रिंकल जैनने पुढे सांगितलं की, "आईचा खून केल्यानंतर तिने मृतदेह कापला तेव्हापासून ती दिवसभर घराच्या खिडकीत उभी राहायची आणि लालबाग जंक्शनवरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवायची. तिला कशातच रस राहिला नव्हता. इतकंच काय तिने आंघोळही केली नव्हती."

मृतदेहाचे सीटी स्कॅन करणार!

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिंकल जैनच्या घरात सापडलेला कुजलेला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रुग्णालयात शवविच्छेदनापूर्वी त्या मृतदेहाचे सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. जेणेकरुन वीणआ जैन यांची तोंड की गळा दाबून हत्या केली, हे समजू शकणार आहे.

सीटी स्कॅनमध्ये हे स्पष्ट होईल की वीणा जैन यांचा मृत्यू जर गुदमरल्यामुळे झाला असेल, तर मृतदेहाच्या नाकाच्या हाडांला इजा झाली असावी आणि जर मृत्यू गळा दाबून झाला असेल तर त्याचा परिणाम मानेच्या हाडांवर दिसून येईल, असं अधिकाऱ्याने पुढे म्हटलं.

डिसेंबर 2022 मध्येच वीणा जैन यांचा खून?

महत्त्वाचं म्हणजे वीणा जैन यांची हत्या डिसेंबर महिन्यात झाली असावी असा संशय पोलिसांना आहे आणि तेव्हापासून आरोपी रिंकल जैनने मृतदेह घरात लपवून ठेवला होता.

काय आहे नेमकी घटना?

मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशन अंतर्गत लालबागमध्ये मंगळवारी (14 मार्च) रात्री अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लालबाग इथल्या इब्राहिम कासम इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये आढळला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या 23 वर्षीय मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात तिनेच आईचा खून केल्याचं समोर आलं. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू जप्त केला असून आरोपी मुलीने या धारदार शस्त्राच्या सहाय्याने महिलेच्या शरीराचे पाच तुकडे करुन ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तिच्याच घरातील कपाटात आणि लोखंडी पाणीच्या टाकीत ठेवले होते. 

संबंधित बातमी

लालबागमध्ये आईची हत्या करून शरीराचे केले पाच तुकडे, क्रूर मुलीचे कृत्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Akshay Shinde Encounter : विरोधकांचे गंभीर आरोप; अक्षय शिंदे एन्काऊंटरची बदलापूर फाईलAditya Thackeray On Shinde Encounter : 'त्याला फाशीच व्हायला हवी होती, मात्र जे घडलं ते हलगर्जीपणा'Opposition On Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर विरोधकांचे संतप्त सवालAkshay Shinde's Mother Reaction : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या पालकांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं, अक्षयनं बंदूक कसं हिसकावलं?; पोलिसांनीच सांगितला सिनेस्टाईल थरार
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं, अक्षयनं बंदूक कसं हिसकावलं?; पोलिसांनीच सांगितला सिनेस्टाईल थरार
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
Embed widget