एक्स्प्लोर
Advertisement
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter: बदलापूरच्या शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास परिसरात एन्काऊंटर करण्यात आला.
ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सगळ्यानंतर अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. शाळा प्रशासनाने (Badlapur School case) हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठीच आमच्या मुलाला पैसे देऊन ठार मारले, असा आरोप अक्षय शिंदे याच्या नातेवाईकांनी केला.
अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी दुपारीच त्याला तळोजा कारागृहात जाऊन भेटून आले होते. ते पावणेचारच्या सुमारास तुरुंगातून बाहेर पडले. त्यानंतर पोलिसांनी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदे याला बदलापूरला नेले. याबाबत अक्षय शिंदे याच्या पालकांना कोणतीही कल्पना नव्हती. अक्षय शिंदे याच्या काकांनी या सगळ्या घटनाक्रमाबाबत शंका व्यक्त करताना जेलमध्ये अक्षयच्या हातात असलेल्या एका कागदाचा उल्लेख केला आहे. या कागदामुळे अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर आणि या संपूर्ण प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.
नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदे याच्या काकांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण सगळे सोमवारी दुपारी अक्षयला भेटायला तळोजा कारागृहात गेलो असल्याचे सांगितले. मी तुरुंगाबाहेरच उभा होतो. अक्षयचे आई-वडील तुरुंगात गेले होते. त्यांची आणि अक्षयची 20 मिनिटांची भेट झाली. तेव्हा अक्षयने आई-वडिलांना पैसे पाठवायला सांगितले. त्यासाठी अक्षयने आई-वडिलांना एक नंबर दिला होता. त्यांचे बोलणे सुरु असताना अक्षयच्या हातात एक मोठा पेपर होता. कोणीतरी आपल्याला हा पेपर लिहून दिल्याचे अक्षयने आईला सांगितले. त्या पेपरमध्ये काय लिहलंय, असं अक्षयने आईला विचारले. आईने अक्षयला विचारले की, हा पेपर तुला कोणी दिला? त्यावर अक्षयला व्यवस्थित उत्तर देता आले नाही. अक्षयच्या आईने तो पेपर बघितला, पण त्यामध्ये काय लिहलंय, ते तिला वाचता आले नाही. तो पेपर पाहून अक्षयच्या आई-वडिलांना शंका आली. तेव्हा आईने म्हटले की, कोणी काय दिलं असेल ते फेकून दे. पण त्या कागदावर काय लिहून दिलं होतं, हे अक्षयच्या आई-वडिलांनाही शेवटपर्यंत समजले नाही, अशी माहिती अक्षयच्या काकांनी दिली. अक्षयला फटाकड्या कशा वाजवायच्या किंवा गाडी कशी चालवायची, हे माहिती नाही. मग तो बंदूक कसा चालवू शकतो, असा सवालही अक्षयच्या पालकांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्राईम
राजकारण
Advertisement