(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अल्पवयीन मुलीचा हेल्थ क्लबमध्ये विनयभंग; घटनेनंतर चित्रा वाघ यांचा माजी आमदार दिलीप सानंदांवर घणाघाती आरोप
Buldhana News : खामगाव शहरातील सीएम हेल्थ क्लब या जिम मध्ये जिम ट्रेनरने जिममध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याची घटना घडली होती. यावरून आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे.
Buldhana News : खामगाव शहरातील सीएम हेल्थ क्लब या जिम मध्ये जिम ट्रेनरने जिममध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याची घटना घडली होती. मुलीच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडिओ जारी करत खामगावचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा (Dilip Sananda) आणि त्यांच्या परिवारावर घणाघाती आरोप केले होते. मात्र आज दिलीप सानंदा यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांचे खंडन केल आहे.
बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील खामगाव शहरातील सीएम हेल्थ क्लब मध्ये साधारणता आठवडाभरापूर्वी एका दलित अल्पवयीन मुलीचा विनयभंग जिम ट्रेनर असलेला अमर पिंपळकर याने केला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनला विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि ॲट्रॉसिटीनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत असून आरोपी अमर पिंपळकर अद्याप फरार आहेत.
आरोपीला फरार करण्यात दिलीप सानंदा यांचा हात
दरम्यान, या घटनेला घडून साधारणता एक आठवडा झाला. मात्र त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ जारी करत खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा आणि त्यांच्या परिवारावर गंभीर आरोप करत दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फरार करण्यात दिलीप आनंदात यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. शिवाय काँग्रेस पक्षावरही गंभीर आरोप केले आहेत.
तात्काळ माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे
या संपूर्ण आरोप प्रकरणी आज काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांचा खंडन केल आहे आणि चित्रा वाघ यांनी तात्काळ माफी न मागितल्यास त्यांना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे लागू शकतो, असेही ठणकावून सांगितला आहे. चित्रा वाघ यांचे आरोप हे राजकीय प्रेरणेने करण्यात आले असून स्थानिक आमदारांनी त्यांना खोटी माहिती दिल्याचही दिलीप सानंदा यांनी म्हटलं आहे. अल्पवयीन दलित मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये रंगलेल्या या आरोप प्रत्यारोपाच्या युद्धामध्ये अत्याचार करणारा आरोपी मात्र फरार आहे. चित्रा वाघ यांनी केलेले आरोप आणि दिलीप सानंदा यांनी केलेले खंडन यामुळे मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या