एक्स्प्लोर

Baba Adhav Pune : आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

Baba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

देशात आणि राज्यात नुकत्याच लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकींमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याच्या अनेक पक्षांनी तक्रारी केली. त्यानंतर आता राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या निकालानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. तर अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळे करून जिंकल्याचा दावा केला जात आहे, अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.   आंदोलन नेमकं कशासाठी? निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे, असं म्हणत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं.   निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी म्हटलं होतं.  या घटनेचा निषेध म्हणून 94 वर्षीय डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारलं. आज शनिवारी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. बाबा आढाव यांनी गुरूवारी तीन दिवसांसाठीचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे.   राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करीत तीन दिवस ते उपोषणाला बसले होते.   या लढ्याबाबत बोलताना बाबा आढाव म्हणाले, विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो, ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे,. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली. तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आणि त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही. या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report
Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget