एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Death Threat: मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय कांचन साळवीला अटक

Manoj Jarange Patil Death Threat : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आलेल्या जीवेमारण्याच्या धमकी प्रकरणी (Death Threat) मोठी माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange Patil Death Threat जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आलेल्या जीवेमारण्याच्या धमकी प्रकरणी (Death Threat) मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कांचन साळवी (Kanchan Salvi) असे या आरोपीचे नाव आहे. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन, चौकशी अंती त्याला अटक केलं.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी कांचन साळवी (Kanchan Salvi) याला जालना पोलिसांनी अटक केली आहे. साळवी हा आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा जरांगेंनी केला होता, जे आरोप मुंडे यांनी फेटाळले आहेत. अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजू मांडली होती, 'गरडसाहेब माझा अर्थार्थिकपणतच संबंध नाहीये. जे पण काही चौकशी असेल, नार्कोटिक्स असेल, त्यावर मी पूर्णपणे समोर जायला तयार आहे.' या अटकेमुळे आता पोलीस तपासात साळवी, गरड आणि अमोल खुने यांच्यातील संबंधांची चौकशी केली जाईल. दरम्यान, कालच माध्यमांसमोर येऊन कांचन साळवी याने आपण अमोल खूनेला ओळखतो. मात्र दादा गरडशी आपला कसलाही संबंध नव्हता, तोच आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता, असा आरोप कांचन साळवी यान केला होता.

Manoj Jarange News : हत्येच्या कटाप्रकरणी या पूर्वी दोन आरोपींना अटक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी, गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जातं आहे.

Manoj Jarange Vs Dhananjay Munde : मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेंनी केली मागणी

मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: नवऱ्याच्या मृत्यूचे ढोंग रचून बायको ओक्साबोक्सी रडली, दुसरीकडे पतीच्या मित्राला 'कार्यक्रम ओके'चा कोडवर्ड; चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकणारा बीडमधील थरार
नवऱ्याच्या मृत्यूचे ढोंग रचून बायको ओक्साबोक्सी रडली, दुसरीकडे पतीच्या मित्राला 'कार्यक्रम ओके'चा कोडवर्ड; चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकणारा बीडमधील थरार
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Crime News: 36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले अन्...; ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंताच्या मृत्यूचं गूढ उकललं!
36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले अन्...; ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंताच्या मृत्यूचं गूढ उकललं!
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Lalbaug cha Raja 2026 Muhurat Pujan: चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
Embed widget