Thane : रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी अंगावर उडाले, बुटेलवाल्यानं रिक्षाचालकास चाकूने भोकसलं, गुन्हा दाखल
ठाण्यात रिक्षा खड्ड्यात गेल्याने उडाले होते रस्त्यावरील पाणी..कासारवडवलीत रिक्षा चालकावर चाकूने हल्ला तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Thane Crime News : पावसाचे पाणी उडाल्यामुळे रिक्षाचालक आणि बुटेलचलकामध्ये तू तू मैं मैं झालं. त्याचं रुपांतर वादात झाले. माझ्या अंगावर पाणी का उडवले, असे म्हणत रिक्षाचालकाला चाकूने भोकसल्याची घटना ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे ही घटना घडली.
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याने चालणाऱ्या रिक्षाचे चाक खड्ड्यात गेल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या बुलेटवरील दुचाकीस्वारावर खड्ड्यातील पाणी उडाले. याचा राग मनात धरून रिक्षाचालक शाकीर रसुल शेख (33) याला प्रथम चापटीने मारहाण केली. प्रवासी सोडून आल्यानंतर पुन्हा गाठून चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आरोपी शाहबाज उर्फ नानू खान याच्या विरोधात शनिवारी (ता-13 जुलै) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार शाकीर रसुल शेख (33) रा. परदेशी बाबा चाळ, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे हा रिक्षा चालक असून घटनेच्या दिवशी शुक्रवारी (ता-12 जुलै) रोजी ठाणे स्टेशनवरून उन्नती ग्रीन्स, आनंदनगर, कासारवडवली, जी.बी.रोड, ठाणे येथे प्रवासी भाडे घेऊन निघाला असता संध्याकाळी 5.30 वाजण्याचं सुमारास रिक्षा खड्ड्यात गेल्याने दुचाकीवरील आरोपी शाहबाज उर्फ नानू खान याच्या अंगावर रस्त्याच्या खड्ड्यातील पाणी उडाले. तेव्हा दुचाकी रिक्षा समोर उभी करून रिक्षा चालक तक्रारदार शाकीर शेख याला चापटीने मारहाण केली. रिक्षाचालक भाडे सोडून पुन्हा घोडबंदर रोडवर आले असता संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमर्स पुन्हा त्याच ठिकाणी आरोपी शाहबाज याने अडवून जवळच्या चाकूने शाकीर शेख याच्या पाटीवर वार केला आणि दुचाकीवरून निघून गेला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात शाहबाज उर्फ नानू खान याच्या विरोधात मारहाणीचा आणि धारदार शहस्त्राने वार केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल कार्नाय्त आला.
























