(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli Murder: डोंबिवलीत सोफा सेटमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकळलं; आरोपीच्या चप्पलेमुळं फुटलं बिंग
Dombivli: डोंबिवली दावडी परिसरात एका इमारतीमध्ये सुप्रिया शिंदे या महिलेचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळला होता.
Dombivli: डोंबिवली दावडी परिसरात एका इमारतीमध्ये सुप्रिया शिंदे या महिलेचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. मात्र, काहीच सुगावा नसल्यानं आरोपी शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलं होतें. तपासादरम्यान सुप्रिया यांच्या घराबाहेर आरोपींच्या चप्पला असल्याची माहिती साक्षीदारांनी पोलिसांना दिली. याच चप्पलच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल घावट असं या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मृत महिलेच्या शेजारी राहणारा आहे. पुस्तक देण्याच्या बहाण्यानं तो घरात शिरला. त्यानंतर त्यानं सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान विशालने तिची निर्घृण हत्या केली.
डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारती मध्ये कीशोर शिंदे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आपल्या मुलासह राहत होते .15 फेब्रुवारी रोजी किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. सायंकाळी घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती .त्यांनी तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे विचारपूस केली मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सूमारास किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेले. याच दरम्यान घरी असलेल्या नातेवाईकाना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुप्रिया हिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, कोणताही सुगावा नसल्याने हत्या का व कुणी केली? आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकलं होतं. एसीपी जेडी मोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचा पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चपल कोणती हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले . पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
15 फेब्रुवारी रोजी त्यावेळी दुपारी सुप्रिया यांचा मुलगा शाळेत गेला होता व पती कामावर निघून गेले होते.सुप्रियाला वाचनाची आवड असल्याने विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. सुप्रिया घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला . सुप्रियाने त्याला प्रतिकार केला यावेळी विशालने सुप्रियाचे डोके फरशीवर आपटलं त्यानंतर नायलॉन केबल टायने गळा आवळून तिला जिवे ठार मारले व तिचा मृतदेह घरातील सोफासेट मध्ये लपवून ठेवला .धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले .त्या वेळेला विशाल हा देखील त्यांच्यासोबत गेला होता . या प्रकरणात काहीही सुगावा नसताना फक्त चपले वरून आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले .या इमारतीतील व आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचा देखील आवाहन केलं
हे देखील वाचा-
- Mumbai Crime : धारावीत दिवसाढवळ्या तरुणावर अंदाधुंद गोळीबार; गँगवॉरचा थरार
- धक्कादायक! ऑनलाइन गेमचा चक्रव्यूह; गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात मुलानं जीव दिला, मुंबईतील घटना
- NZ W Vs IND W: भारतीय महिला संघानं एकदिवसीय मालिका गमावली, न्यूझीलंडविरुद्ध सलग तिसरा पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha