(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : Any Desk ॲपच्या मदतीने बँक खाते रिकामी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक
Crime News : कमीशनसाठी फसवणुकीच्या पैसे खात्यावर वळते करून घेणाऱ्या गुजरातच्या आरोपींना दोन स्वतंत्र गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
Crime News : मोबाईलवर अनोळखी लिंक पाठवून एनी डेस्क ॲपच्या मदतीने बँक खाते रिकामी करणाऱ्या टोळीचा मलबार हिलपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कमीशनसाठी फसवणुकीच्या पैसे खात्यावर वळते करून घेणाऱ्या गुजरातच्या आरोपींना दोन स्वतंत्र गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
Any डेस्क नावाचा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास भाग पाडले
योगेशकुमार गणेशभाई कोशीया, (वय 26 वर्षे, सुरत, गुजरात) आणि रवी नवीनभाई उनाडकट (वय 30 वर्षे, सुरत, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये, पहिल्या घटनेत फिर्यादीला त्याच्या मोबाईलवर मेसेज द्वारे लिंक पाठवून त्या लिंकवर जाऊन क्लिक करण्यास सांगितले व ऐनी डेस्क नावाचा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास भाग पाडले. ओटीपीची माहिती प्राप्त करून त्यामध्ये फिर्यादीच्या बँकेची माहिती टाकून बँकेमधून 1,77,926 एवढी रकमेची फसवणूक करण्यात आली. पुढे हेच पैसे योगेश कुमारच्या खात्यात वळते झाल्याचे दिसून आले.
मलबार हिल पोलिसांकडून पर्दाफाश
दुसऱ्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी इसमाची बँकेची माहिती टाकून बँकेमधून 89,999 एवढी रकमेची फसवणूक केल्याने फिर्यादीनी याबाबत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मलबार हिल पोलिस ठाण्याचे सायबर पथकाने आरोपीने गुन्ह्यात वापरलेले आयसी आयसीआय बँक क्रेडीट कार्ड नंबर या खात्याची माहिती मागवण्यात आली. तसेच संबंधित मोबाईल क्रमांकांचे सिडीआर/एसडीआर मागविण्यात आले. नमूद खाते इसम नामे रवी नवीनभाई उनाडकट याच्या नावावर असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांक धारकाने केल्याचे निष्पन्न झाले. नमुद मोबाईल क्रमांकाचे डिटेल्स काढले असता सदर क्रमांक रवी नवीनभाई उनाडकट हा वापरत असल्याचे व त्याचे लोकेश सुरत गुजरात येथे असल्याचे आढळून आले आणि त्याला अटक केली. आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी त्यांच्या आय सी आय सी आय बँक क्रेडीट कार्ड नंबर खात्यांवर स्वीकारलेले पैसे हे आरोपीने स्वतःचे कमिशन घेऊन पुढे साहील मिश्रा या इसमाकडे ट्रान्सफर करण्यात आल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.