Crime News : अमली पदार्थांचा कौटुंबिक व्यवसाय; मुलगा, मुलीनंतर बापालाही अटक, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
Crime News : चौकशीदरम्यान, या कुटुंबाचा अंमली पदार्थात गुन्हेगारी इतिहास असल्याचे पोलिसांना आढळून आले.
Crime News : मुंबई गुन्हे शाखेच्या वरळी युनिट, अँटी नार्कोटिक सेलने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून 17.25 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. चौकशीदरम्यान, या कुटुंबाचा अंमली पदार्थात गुन्हेगारी इतिहास असल्याचे पोलिसांना आढळून आले.
संशयित व्यक्तीच्या मागावर पोलिस
मुंबई गुन्हे शाखेच्या वरळी युनिट, अँटी नार्कोटिक सेलने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडे 17.25 लाख रुपये किमतीचे 115 ग्रॅम ड्रग्ज मेफेड्रोन (MD) जप्त केला आहे.
एएनसी सेलचे पथक माहीम परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्या ताब्यात 115 ग्रॅम मेफेड्रोन (MD)आढळून आला. अहमद मोहम्मद हुसेन शेख (62) असे अटक आरोपीचे नाव असून तो माहीमचा रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबाचा अंमली पदार्थात गुन्हेगारी इतिहास
संबंधित व्यक्तीने हे ड्रग्ज कुठून आणले हे तपासण्यासाठी वरळी ANC अधिक तपास करत आहे. तसेत ड्रग्ज सप्लाय सिंडिकेट तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी मुलगा जावेद उर्फ जावा याला 2017 मध्ये ANC च्या वरळी युनिटने 1 किलो 150 ग्रॅम चरससह अटक केली होती. अहमदच्या कुटुंबाचा अंमली पदार्थात गुन्हेगारी इतिहास असल्याचे पोलिसांना आढळून आले. अहमद यांची मुलगी नजमा हिलाही ANC च्या घाटकोपर युनिटने 2021 मध्ये 100 ग्रॅम एमडी आणि 2 किलो 700 ग्रॅम चरससह अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या: