एक्स्प्लोर

Cyber Attack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक, जाणून घ्या त्यामागचे कारण

 Cyber attack on India : नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील मुस्लिम देश आणि संघटना भारतावर नाराज आहेत

मुंबई :  देशातल्या अनेक सरकारी वेबसाईटवर सायबर हल्ला झाला. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह सत्तर वेबसाईट हॅक करण्यात आल्या. मलेशियातील हॅक्टिविस्ट  ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रसह सर्व भारतातील अनेक वेबसाईट आज सकाळी हॅकर्स कडून हॅक करण्यात आल्या होत्या. अचानक झालेल्या या सायबर हल्ल्यानंतर पोलिसांची सायबर गुन्हे शाखा पुरती गोंधळून गेली होती. कुणी केला होता हा सायबर अटॅक आणि त्यामागचे कारण काय हे जाणून  हे जाणून घेऊया. 

नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश या वेबसाईटवरून देण्यात आला. पहाटे 4 पासून हॅक करण्यात आलेली ठाणे पोलिसांची वेबसाईट दुपारी बाराच्या सुमारास पूर्ववत करण्यात यश आलं. हॅकर्सकडून डेटा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. 

 सकाळीच ठाणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईट हॅक झाल्यान खळबळ उडाली. कोणालाच कळेना की नेमके काय झाले आहे. 
 ठाणे शहर पोलिसांची वेब साईट ओपन केल्यावर हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश येत होत. त्याखाली, भारत सरकारला उद्देशून असे सांगण्यात आले होते की, तुम्ही वारंवार इस्लाम धर्मासमोर अडचणी निर्माण करत आहात.  तुम्हाला सहनशीलता कळत नाही, लवकरात लवकर सर्व मुस्लिम बांधवांची माफी मागा नाही तर आम्ही गप्प बसणार नाही.  फक्त ठाणे पोलीसच नाही तर हळूहळू महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील इतर देखील अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांच्या वेबसाईट कोणीतरी हॅक केल्याचे निष्पन्न झाले आणि महाराष्ट्र सरकारला देखील याची दखल घ्यावी लागली. 

 एकीकडे गृहमंत्री प्राथमिक माहिती सांगत होते तर दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांची सायबर क्राईम टीम या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि सायबर क्राईम टीमच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या.  या सर्व वेबसाईटच्या हॅकिंग मागे जागतिक हॅकर्स असल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले. एकाच वेळी अनेक वेबसाइट हॅक केल्यामुळे हा एक सायबर हल्ला असल्याचे तज्ज्ञ बोलू लागले. मात्र त्यांनी अचानक भारतावर हा सायबर हल्ला का केला असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तर याचे उत्तर होते नुपुर शर्मा प्रकरण. 

 नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील मुस्लिम देश आणि संघटना भारतावर नाराज आहेत. त्यातच मलेशिया येथील हॅक्टीविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्स यांनी भारताविरुद्ध सायबर वॉर सुरू केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून त्यांनी जगभरातल्या हॅकर्स लोकांना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आव्हान केले आहे. यासोबतच इंडोनेशिया आणि इतर देशातील हॅकर्सनी भारताविरोधात ops patuk सुरू केले आहे याचा अर्थ होतो स्ट्राइक बँक. सरकारी वेबसाईट हॅक होण्याची ही पहिलीच घटना असून याआधी देखील अनेक महत्वाच्या सरकारी वेबसाईट हॅक झालेल्या आहेत. यासाठी आपल्या इथे असलेली कमकुवतच सायबर सुरक्षा कारणीभूत आहे असे तज्ञांचे मत आहे.  

नुपुर शर्मा प्रकरणामुळे संपूर्ण जगभरात मुस्लिम संघटना मुस्लिम देश आणि मुस्लिम अतिरेकी गट यांनी भारताविरुद्ध नाराजी व्यक्त करून आपापल्या परीने भारताचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. अल कायदासारख्या अतिरेकी गटाने देखील भारताला इशारा दिला आहे. त्यातच भारतावर आता हॅकर्स करून देखील सायबर हल्ला केले जात आहेत. यामुळे भारतातील सरकारी अधिकृत वेबसाइटवर असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण डेटा लिंक होण्याची शक्यता जास्त आहे. आणि असे झाले तर याची खूप मोठी किंमत भारत सरकारला मोजावी लागेल. 

संबंधित बातम्या :

भारतावर सायबर हल्ला! ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget