Maharashtra Crime : महाराष्ट्र हादरला! नववर्षाच्या सुरुवातीच्या 2 दिवसांत 11 हत्येच्या घटना, राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा
Maharashtra Crime : नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन दिवसात म्हणजे 1 आणि 2 जानेवारी या दोन दिवसता राज्यात 11 हत्येच्या घटना घडल्या आहेत.
Maharashtra Crime : नव्या वर्षाची सुरुवात ही हत्येच्या (Crime News) घटनांनी झाल्याचं पहायला मिळालंय...राज्यात १ आणि २ जानेवारी अशा दोन दिवसात तब्बल 11 हत्येच्या घटना (Maharashtra Crime) उघडकीस आल्यात...उपराजधानी आणि स्मार्ट सिटी नावाने ओळखल्या जाण्याऱ्या नागपुरात पोटच्या पोरानं जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना ऐन नववर्षाच्या पहिल्या दिवशी समोर आलीये...शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात प्रेम प्रकरणातून मुलीच्या वडील आणि दोन भावांकडून 17 वर्षीय तरुणाची हत्या (Crime News) करण्यात आलीये...तसंच आणखी सात शहरात हत्येच्या धक्कादायक घटना (Maharashtra Crime) उघडकीस आल्यात...एकीकडे सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Crime News) आबाधित असल्याचा दावा करते...याउलट राज्यात कायद्याचेच तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय...
इंजिनिअरिगचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने केली आई व वडिलाची हत्या..
पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला होता. कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली होती. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी या प्रकरणातील मृतांची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला.
मुलीच्या मित्राला वडील आणि भावाने क्रूरपणे संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना..
प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडील आणि दोन भावांनी मिळून 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या केली. लेकीसोबत बोलत असल्याचा राग; बापानेच काटा काढल्याचे समोर आले. गणेश तांडे असं हत्या करण्यात आलेल्या 17 वर्षीय तरुणाच नाव आहे. रात्री 12:30 ते 1 च्या सुमारात वाघोलीतील वाघेश्वर नगर परिसरातील घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गणेश आणि लक्षण पेटकर यांची मुलगी मित्र होते. दोघेही एकमेकांसोबत बोलत होते. मात्र हे लक्ष्मण पेटकर यांना आवडत नव्हतं.गणेश रोज प्रमाणे मित्रासोबत वाघेश्वर नगर परिसरात फिरत होता. त्यावेळी आपल्या मुलीसोबत बोलत असल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून गणेश तांडे याची मध्यरात्री दगडाने ठेवून आणि रॉडने मारुन हत्या केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. लक्ष्मण पेटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या