Lawyer Couple Murder Case : बहुचर्चित राहुरी हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट; माफीचा साक्षीदाराने कोर्टासमोर उलगडला संपूर्ण हत्येचा घटनाक्रम
Lawyer Couple Murder Case: राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीने आपल्या कृत्याची कबुली दिली आहे.

अहिल्यानगर: राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तसेच मारेकर्यांने पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकले. दरम्यान या प्रकरणी आता नवी माहिती पुढे आली असून संशयित आरोपीने आपल्या कृत्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेला हर्षद ढोकणे याने अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात दिली आहे.
माफीचा साक्षीदाराने कोर्टासमोर उलगडला संपूर्ण हत्येचा घटनाक्रम
बहुचर्चित राहुरी येथील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव खून खटल्याची जिल्हा न्यायालयमध्ये सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील हर्षद ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. आरोपी ढोकणे यांनी मंगळवारी झालेल्या सर तपासणीत खुनाचा घटनाक्रम न्यायालयासमोर कथन केला. राहुरी येथील न्यायालयातून आढाव दांपत्याचे अपहरण करून 25 जानेवारी रोजी त्यांच्याच मानोरी येथील बंगल्यावर नेण्यात आले. तेथे मुख्य आरोपी किरण दुशिंग यांनी वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वकील दाम्पत्याला आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनातून ब्राह्मणी गावातील इंग्लिश मीडियम शाळेच्या मोकळ्या जागेत नेले. वकील दाम्पत्याचा खून केल्यानंतर उंबरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ जाऊन मृतदेह साडीत गुंडाळला आणि विहिरीत टाकून दिल्याची कबुली माफीच्या साक्षीदाराने कोर्टासमोर दिली आहे.
"माझ्या आई-वडिलांना मारले, आता आम्हालाही मारा"
वकील दाम्पत्याची हत्या केल्यानंतर चार ते पाच लाख रुपये मिळणार होते, मात्र किरण दुशिंग यांनी प्रत्येकी फक्त दहा हजार रुपये दिले असे माफीचा साक्षीदार ढोकणे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. आरोपीने राजाराम आढाव यांच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घातली, त्यावेळी त्यांच्या पत्नी मनीषा आढाव या ओरडल्या "माझ्या आई-वडिलांना मारले, आता आम्हालाही मारा" असे त्या आरोपी किरण दुशिंग याला म्हणाल्या. त्यांच्या या विधानामागे नेमकं काय हेतू होता? हे पुढील तपासात समोर येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आज जिल्हा न्यायालयात उलट तपासणी होणार असून या उलट तपासणीत नेमकी आणखी कोणते मुद्दे समोर येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























