मोठी बातमी : सतीश वाघ यांचं 6.30 वा अपहरण, 7.30 वा हत्या, 60 मिनिटात गेम, पुणे पोलिसांना काय काय सापडलं?
Satish Wagh Murder Case Update: सतीश वाघ खून प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे. वाघ यांचं अपहरण व खून या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे तपासातून समोर आलं आहे.
पुणे: भाजप नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेने पुणे हादरलं. या घटनेचा सखोल तपास पोलिस करत आहेत. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांचे विविध पथक तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आता मोठी कारवाई करत आत्तापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता सतीश वाघ (Satish Wagh) खून प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे. वाघ यांचं अपहरण व खून या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे तपासातून समोर आलं आहे.
सोमवारी सकाळी 6.30 वाजता सतीश वाघ (Satish Wagh) यांचं अपहरण झाले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह गाडीत टाकून 7.30 वाजता परत आल्याचे सीसीटीव्हून स्पष्ट झाले आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी 500 ते 800 सीसीटिव्ही, तांत्रिक विश्लेषणानंतर पुणे पोलिसांना सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ (Satish Wagh) पहाटे साडे सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचे अपहरण झालं, नंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली. ती कार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी या भागातील जवळपास 500 ते 800 सीसीटीव्ही तपासले गेले.
या तपासामध्ये एक गाडी शिंदवणे घाटाकडे जाताना उरूळी कांचन भागात 7 वाजून 5 मिनिटांनी दिसली. तीच गाडी पुन्हा सात वाजून 20 मिनिटांनी परत आल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला, अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाणकरून व गळा दाबून खून करण्यात आला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्तापर्यंत चार जण पोलिसांच्या ताब्यात
काल (मंगळवारी) रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांनी सतीश वाघ (Satish Wagh) यांचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं. पवन शर्मा आणि नवनात गुरसाळे असं ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यानंतर आज आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे. (Pune Crime News)
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या आणखी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. ज्या गाडीत सतीश वाघ यांचे अपहरण केले होते, त्या गाडीत आणखी 2 जण होते. आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला आणि नंतर त्यांचा मृतदेह हा शिंगवणे घाटात फेकून दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांची विविध पथकं या खून प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune Crime News)
आणखी वाचा - Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...