एक्स्प्लोर

जळकोटमधील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

Maharashtra Latur Crime News: जळकोटमधील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे.

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातील (Latur District) जळकोट शहरात (Jalkot City) एका घटनेनं खळबळ माजली आहे. जळकोट शहरातील उद्घाटना अभावी बंद असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात 70 वर्षी वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळं जळकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा (Department of Public Works) भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. 

लातूर जिल्ह्यातल्या जळकोट येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा  मृत देह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव सोपान मल्हारी मददेवाड असं आहे. मृत व्यक्ती जळकोट तालुक्यातील विराळ येथील रहिवासी असून निराधार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही व्यक्ती याच वसतीगृहात एकटीच राहत होती. पोलिसांना याप्रकराची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी जळकोट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.  

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या ग्रामीण भागांतील मुलींना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी, म्हणून भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ मागासवर्गीय मुलींसाठी 125 क्षमतेचं वसतिगृह बांधण्यात आलं आहे. या इमारतीचं बांधकाम होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र ही इमारत आजही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जळकोट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत, ते उघड झालं आहे. याआधीही या वसतीगृहात अनेक लग्न समारंभ, जनावरं बांधणं, रात्रीच्या वेळी तळीरामांकडून धुमाकूळ घातला जाणं, असे अनेक प्रकार घडले आहेत. वेळोवेळी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंदर्भात तक्रार करूनही काहीच कारवाई झाली नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणाची शासनानं चौकशी करण्याची मागणी विराळ येथील नागरिक सध्या करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

निर्दयीपणाचा कळस! चिमुकलीला धावत्या गाडीबाहेर फेकत महिलेचा विनयभंग, पीडितेनंही घेतली उडी, 10 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget