Kalyan crime News : भांडण नवरा बायकोचं ,त्रास मात्र पोलिसांना
Latest News on Kalyan crime : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा काहीच नेम नसतो. बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग एका महाभागाने पोलिसांवर काढला.
Latest News on Kalyan crime : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा काहीच नेम नसतो. बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग एका महाभागाने पोलिसांवर काढला. घरात बायकोसोबत भांडण झाले की हा महाभाग दारूच्या नशेत वेगवेगळ्या नंबरवरून मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करत होता. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायचा. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा नंबर जस्ट डायलवर शोधून त्यांना देखिल शिवीगाळ केली. सुरुवातीला पोलिसांनी दुर्लक्ष केलंमात्र सातत्याने फोन येत होते. त्यामुळे अखेर या महाभागाला शोधून काढत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. सतत फोन करणाऱ्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना देखील त्याने धकबुक्की केली. हेमंत कंसारा असं या महाभागचं नाव आहे. त्याला डोंबिवली देसलेपाडा येथुन अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली देसले पाडा परिसरात हेमंत कंसारा हा आपल्या पत्नी सोबत राहत होता. हेमंतला दारुचे व्यसन आहे. दारु पीत असल्यामुळे हेमंतचे घरी पत्नी सोबत भांडण होत होते. याच भांडणाचा राग हेमंत दारूच्या नशेत पोलिसांवर काढात होता. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायचा. हेमंतने दारूच्या नशेत जस्ट डायलवरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा नंबर काढला. त्यानंतर मोबाईलवर फोन करून त्यांना देखील शिवीगाळ केली. सुरुवातीला पोलिसांनी दुर्लक्ष केलं. मात्र वारंवार शिवीगाळ करत असल्याने या महाभागाला पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर त्याला डोंबिवली देसले पाडा परिसरातून अटक केली. त्याला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना देखील त्याने धकबुक्की केली.
संबंधित बातम्या :
'कोरोना इतना बढे की बस मुझे ले जाये', 'डेथ इज गोल, मॅच्युरिटी इज द वे'... वहीमध्ये अशा नोंदी करुन विद्यार्थिनीची आत्महत्या
Nashik News : एक रुपयाच्या भरपाईवर विवाहितेला मोबाईलवर घटस्फोट, सिन्नरमध्ये धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live