एक्स्प्लोर

Kurla Best Bus Accident: 8 वाहनांना उडवत मार्केटमध्ये घुसली; महिला बस अन् कारमध्ये अडकली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार

Kurla Best Bus Accident: अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Kurla Best Bus Accident मुंबई: मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात (Kurla Best Bus Accident) 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (9 डिसेंबर) रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की यात 5 जणांचा मृत्यू झालाय. 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विजय विष्णू गायकवाड, आफ्रीन अब्दुल सलीम शहा, अनम शेख, फातिमा गुलाम कादरी, शिवम कश्यप अशी मृतांची नावं आहेत. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला आहे. 

प्रत्यक्षदर्शीने सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार-

सदर बसने 7 ते 8 गाड्यांना उडवलं. यामध्ये दोन ते तीन रिक्षा होत्या. त्यानंतर दोन टेम्पो आणि गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली. कितीजण जखमी झाले याबाबत माहिती नाही, पण अपघात झाला तेव्हा एक महिलेचा जागेवरच मृत्यू झाला होता. ती महिला बस आणि एका गाडीच्यामध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला. काही मुलांना लगेच बाहेर काढलं. त्यानंतर मार्केटजवळ दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, असं प्रत्यक्षदर्शी अजीम अन्सारी यांनी दिली. 

बस चालकाला अटक-

या प्रकरणी बस चालक संजय मोरे (54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे. 

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. जखमींवर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच प्रार्थना करते, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

पीडित कुटुंबांना आवश्यक ती सगळीच मदत करावी- वर्षा गायकवाड

या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काय कारण असेल, हे समोर आलं पाहिजे आणि या प्रकरणातील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंबई काँग्रेस पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून लागेल ती मदत करेल. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, जखमींना तातडीनं उचित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती सगळीच मदत करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार, VIDEO

संबंधित बातमी:

Kurla Bus Accident: वाऱ्याच्या वेगाने आली, नागरिक सैरावैरा पळाले; अंगावर काटा आणणारा कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
Embed widget