एक्स्प्लोर

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह, संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण

Kalyan Crime News : बहिणीने ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केली. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे.

कल्याण : वारंवार विरोध करूनही बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केले त्यामुळे संतापलेला भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. राधेश्याम चौधरी , इम्तियाज यासिन ,आशिष कुमार प्रसाद,उमेश गौतम, अस्लम शहाबुद्दीन शेख, रिजवान अहमद, अनुप चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी या मुलीच्या भावाचा शोध सुरू केला आहे.

सैराट प्रेमाची कहाणी! 

उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात अनुष्का वर्मा आपल्या कुटुंबासह राहते. तिचे खुदिराम चौधरी याच्याशी प्रेम संबंध होते. खुदीराम हा कामानिमित्त कल्याण जवळील बनेली येथे राहतो, तो ड्रायव्हर आहे. या दोघांनी सप्टेंबर 2023 मध्ये लपून प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहबाबत कुटुंबात कोणालाही माहिती नव्हती. खुदीराम हा ड्रायव्हर असल्याने अनुष्काच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. 25 एप्रिल रोजी अनुष्का घरातून अचानक बेपत्ता झाली. 

बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह

अनुष्काच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. अनुष्का एका मुलासोबत झाशीला गेली आहे, तेथून तिने कल्याणसाठी गोरखपूर एक्स्प्रेस पकडली आहे, ही माहिती अनुष्काच्या कुटुंबियांना मिळाली. अनुष्काच्या भावाने याबाबत नाशिक आणि मुंबई येथे राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना माहिती देत अनुष्काला परत आणा असे सांगितले. अनुष्काच्या भावाचे तीन मित्र नाशिकमधून गोरखपूर एक्सप्रेसमध्ये घुसले, फोटोच्या आधारे एक्सप्रेसमध्ये अनुष्काचा शोध घेतला. 

संतापलेल्या भावाची पतीला बेदम मारहाण

याच दरम्यान त्यांना अनुष्का दिसली त्यांनी अनुष्काचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वेळेला खुदीराम याने त्यांना फोटो काढताना पाहिले. खुदीरामने या तरुणांना फोटो का काढता याबाबत जाब विचारला तोपर्यंत ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. अनुष्काच्या भावाचे आणखी चार मित्र हे कल्याण रेल्वे स्थानकावर गोरखपुर एक्सप्रेसची वाट बघत होते. ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचताच सहा ते सात जणांनी अनुष्का आणि खुदिराम याला घेरलं. त्यांनी खुदीराम याला बेदम मारहाण केली आणि अनुष्काला आपल्या दिशेने खेचलं.

कल्याण रेल्वे स्थानकात घडली घटना

कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडत होता. याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली. कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. बहिणीने एका ड्रायव्हरसोबत लग्न केलं या रागातून या मुलीच्या भावानेच हे गुंड पाठवले, खुदिराम याला मारहाण करत अनुष्काला पुन्हा घेऊन येण्यास सांगितलं असल्याचं निष्पन्न झालं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्लाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget