Gondia News : आधी सोबत दारू प्यायली, नंतर मित्रानेच काढला मित्राचा काटा; दोघांना अटक, नेमकं काय घडलं?
Gondia Crime News : गोंदिया शहरातून एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. यात पत्नीची बदनामी करतो म्हणून मित्रानेच मित्रावर चाकुने हल्ला केलाय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय.
Gondia News गोंदिया : गोंदिया (Gondia Crime) शहरातून एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. यात पत्नीची बदनामी करतो म्हणून मित्रानेच मित्रावर चाकुने हल्ला केलाय. गोंदिया शहर पोलीस (Police) ठाण्यांतर्गत येत असलेल्या सिंगलटोली मैदान दर्गा जवळ हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यात मित्राने आपल्या मित्रावर चाकूने भोसकून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान घडलेल्या या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी (Gondia Police) संयुक्त कामगिरी करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रशांत ऊर्फ दहू सुरेश वाघमारे (वय 30 रा. लटोली) आणि अविनाश ईश्वर बोरकर (वय 42, रा. लक्ष्मीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
मित्रानेच काढला मित्राचा काटा; नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश बोरकर याने सांगितले की, गंगाधर आणि अविनाश हे दोघे मित्र असून गंगाधर हा नेहमी अविनाशच्या पत्नीची बदनामी करीत होता. त्यावरून त्याचा राग अगोदरपासून त्याच्या डोक्यात असतानाच घटनेच्या दिवशी ते तिघे दारू पित असताना गंगाधरने परत अविनाशच्या पत्नीची बदनामी केली. यामुळे दारूच्या नशेत संतप्त झालेल्या अविनाशने रागाच्याभरात त्याला जिवानिशी ठार करण्याच्या उद्देशातून गंगाधर विजय चांद्रिकापुरे (वय 40, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुद्ध वॉर्ड) याच्या पोटावर, छातीवर आणि शरीरावर वार करून गंभीररीत्या जखमी करून जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी भान्यासं कलम 109, 3 (5) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोघांना अटक, 22 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, परिसरातील नागरिकांची विचारपूस आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत वाघमारे याला डोंगरगड येथून तर अविनाश बोरकर याला रामटेक येथून पकडून जेरबंद करण्यात आले. तर दोघांना न्यायालयात हजर केल्यास त्यांना 22 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या.