एक्स्प्लोर

मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत

बारामती तालुक्यातील मूर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिकानजीक एक संशयीत बोलेरो पिक अप वाहन आणि हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी थांबवली.

पुणे : गोवा हे पर्यटनासाठी जेवढं प्रसिद्ध ठिकाण आहे, तेवढंच तेथे कमी पैशात किंवा स्वस्तात मिळणाऱ्या दारुमुळेही (Liqour) गोवा पर्यटकांची पंसत आहे. गोवा सरकारने दारुवरील टॅक्स कमी केल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील इतर ठिकाणांपेक्षा कमी किंमतीत गोव्यात दारू मिळते. मात्र, गोव्यातून दारु दुसरीकडे नेता येत नाही.तरीही पर्यटक छुप्या पद्धतीने गोव्यातून दारुची अवैध वाहतूक होत असते. गोव्याकडून (Goa) अवैधरित्या नगर जिल्ह्यात दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क (Crime News) विभागाच्या दौंड विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. दुसरीकडे पुणे शहरात गुटख्याची 250 ते 300 पोती जप्त करण्यात आली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. 

बारामतीच्या मोरगाव सुपे रस्त्यावर मूर्टी गावच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागाने ही दारू पकडली. बारामती तालुक्यातील मूर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिकानजीक एक संशयीत बोलेरो पिक अप वाहन आणि हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी थांबवली. तसेच, वाहन चालकाकडे वाहनांमध्ये काय आहे, अशी विचारणा करत चौकशी केली असता दोन्ही वाहन चालकांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अधिक विचारपूस करण्यात आली. ही दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन तपासणी केली असता आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड गोवा राज्यात तयार केलेली व विक्री परवानगी असलेली विदेशी दारू सापडली. त्यामध्ये तब्बल 12 लाख 61 हजार रुपयांची दारू, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोबाईल हँडसेट असा 30 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने जप्त केला. 

अहमदनगर जिल्ह्यात ही दारू विक्री करण्याच्या उद्देशाने परराज्यातून चोरून आणल्याचे आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 चा 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेमकी कुठे ही दारू नेण्यात येत होती, या अगोदरही अशा पद्धतीने दारुची अवैध विक्री झाली आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठे छापेमारी

पुण्यातील नऱ्हे परिसरातून 1 कोटी 39 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 250 ते 300 गुटख्याची पोती जप्त करण्यात आली आहेत. एकाच ठिकाणी असलेल्या गुटखा कारखाना आणि गोडाऊन वर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून पुण्यातून नगर, नाशिक, सातारा अशा अनेक ठिकाणी या गुटख्याची विक्री होत होती.  पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारखान्यांवरून गुटखा तयार करण्याचे सामग्री सुद्धा जप्त केली आहे. या कारवाईतून गुटखा विक्री आणि उत्पादन करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुष्पेंद्र सिंग, सुनिल सिंग, मुकेश गेहलोत आणि चंदन सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आरोपींचा साथीदार निलेश ललवानी याच्यावरही गुन्हा दाखल असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget