एक्स्प्लोर

Baramati Crime : डोक्यात कोयता घालून पित्याकडून सावत्र मुलाचा खून, फरार पिता अवघ्या 3 तासांत जेरबंद

Baramati Crime News : पित्यानं आपल्या सावत्र मुलाच्या डोक्यात कोयत्यानं वार करुन त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्यात.

Baramati Crime : बारामती तालुक्यातील पारवडी येथे पित्यानं सावत्र मुलाचा कोयत्यानं वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकानं वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली होती.

पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सावत्र मुलाचा खून करुन पसार झालेल्या पित्याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर 3 तासाच्या आत आरोपीला अटक करुन पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पारवडी गावच्या पोलीस पाटीलांनी पारवडी गावच्या हद्दीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकानं स्वत:च्या मुलाचा कोयत्यानं डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी  पोहचले होते. यावेळी आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावचे हद्दीत आला असून त्यानं त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्या रागात मारुती जाधव यानं स्वत:च्या मुलाच्या डोक्यात आणि मानेवर कोयत्यानं वार करत खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. 

गुन्हेशोध पथकानं तात्काळ आरोपी अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरु केली. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्यानं त्याचा शोध घेणं कठीण होतं. तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्यानं आरोपीची कोणतीही ओळख फोटो उपलब्ध नव्हता. सदर आरोपी अटक करणं जिकीरीचं काम होतं. गुन्हेशोध पथकानं पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सूचनेप्रमाणे, घटना स्थळापासूनचा वनविभागाचा 10 ते 15 किमीचा टप्पा पायी चालत शोधमोहीम राबवली. त्यानंतर वनविभागातील झाडीत लपलेला आरोपीस अवघ्या 3 तासांत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. 

पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

Embed widget