Nagpur Central Jail : नागपूर मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध भडकले! प्रेयसीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी
Nagpur Central Jail : नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) परत एकदा टोळीयुद्ध झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन गटात वाद निर्माण होऊन कारागृहातच तुंबळ हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे.
Nagpur News नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) परत एकदा टोळीयुद्ध झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन गटात वाद निर्माण होऊन कारागृहातच तुंबळ हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे. एका कैद्याच्या प्रेयसीबाबत दुसऱ्या कैद्याने अपशब्द वापरल्याने कैद्यांच्या दोन गटांमध्ये भांडण होऊन ही हाणामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये तीन कैदी जखमी झाले असून सुरज कार्लेवार, मोहम्मद शाकिब अन्सारी आणि वृषभ कावळे अशी या जखमी कैद्यांची नावे आहेत. तर या हाणामारीच्या घटनेत जेल मधील काही साहित्याची ही तोडफोड झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी सात कैद्याविरुद्ध गुन्हा (Nagpur Police) दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
प्रेयसीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी
अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात काल, 11 जून रोजी एक टोळीयुद्ध झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कारागृहातील दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी झाली आहे. तर कारागृहातील अनेक साहित्याचेही यात नुकसान झाले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असताना ही दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात कैद असलेल्या दोन गटात ही हाणामारी झाली आहे.
सात कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल
रविवारी रात्री साकिब अन्सारी आणि वृषभ कावळे यांनी सूरज कार्लेवारच्या ग्रुपमधील लोकेशच्या प्रेयसीबाबत आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. त्यामुळे सूरजचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने या गोष्टीचा बदला घ्यावा म्हणून मंगळवारच्या सकाळच्या सुमारास साकिब, वृषभ आणि त्यांच्या टोळीने या रागातून सुरजवर आणि इतरांवर हल्ला चढवला. यात सूरज जखम झाला. दरम्यान, ही घटना पाहून सूरजचे इतर साथीदार त्याच्या मदतीला आले आणि सूरजने मित्रांच्या मदतीनेही प्रतिहल्ला केला. परिणामी यात दोन्ही टोळीतील कैदी जबर जखमी झाले. ही घटना होत असल्याचे कळताच कारागृहातील पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा प्रकार रोखला. मात्र यावेळी संपूर्ण कारागृहात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सात कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई आता पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या