एक्स्प्लोर

Kalyan Crime : लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं, मैत्रिणीसह आठ जण अटकेत

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षांपासून सुरु असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळलेल्या तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. कल्याणमधील या घटनेत आठ जणांना अटक केली आहे, ज्यात तिची मैत्रिणीचा समावेश आहे.

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने सात तरुण संबंधित तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून या तरुणीने इमारतीवरुन उडी घेत आयुष्य संपवलं.

या प्रकरणी तरुणीचा मोबाईल फोनचा तपास करत त्यात आढळलेल्या सुसाईड नोटच्या आधारे कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती. पोलिसांनी या आठही जणांना अटक केली आहे. हे आरोपी कल्याणमधील एका नामांकित बिल्डरची मुलं आसून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी  पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Kalyan Crime : लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं, मैत्रिणीसह आठ जण अटकेत

कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या मुलीने बारावीची परीक्षा दिली होती नुकताच तिचा निकालही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला 71 तक्के पडले होते. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. सुसाईड नोटमधील मजकुरामुळे पोलीसही थक्क झाले. संबंधित मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमांना एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पीडितेची मैत्रीण होती. पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. दरम्यान अटक केलेल्या आरोपींमध्ये काही जण कल्याणमधील धनदांडग्या बिल्डरचे मुलं असल्याची माहिती समोर येत आहे .

याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे. तिला ढकललं की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांनी करावा. तिला ब्लॅकमेल केलं जात होतं.  बलात्काराची कलमं का लावली नाहीत? कल्याणमधील एका मोठ्या बिल्डरची मुलं यात सहभागी आहेl, आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, बिल्डरकडून आमच्यावर देखील दबाव आणला जात आहे, आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला देखील पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget