मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा उलगडा लावण्यात पोलिसांना यश; सोन्यासह रोकडही सापडली, सीडीबाबत पोलीस म्हणाले....
Eknath Khadse House Robbery: राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

Eknath Khadse House Robbery: राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगाव (Jalgaon Crime) मधील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या घटनेत पोलिसांनी उल्हासनगर (Ulhasnagar) मधील तिघांना अटक केली असून, तीन जण अद्याप फरार (Crime) झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यात सत्तावीस गुन्हे दाखल झाले आहे. या घटनेत चोरी झालेले सोने आणि चांदीचे दागिने देखील जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Eknath Khadse House Robbery: सोन्यासह रोकडही सापडली, सीडीबाबत पोलीस म्हणाले....
दरम्यान, खडसे यांच्या घरात चोरी करण्यापूर्वी त्यांनी खडसे यांच्या घरची काही दिवस रेकी करण्यात आल्याचं पोलिस तपासत समोर आले आहे. या घटनेत खडसे यांनी कागदपत्र ,आणि सीडी चोरीस गेल्याचा आरोप केला होता. मात्र या बाबत खडसे यांनी पोलिसात केवळ दागिने चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती, त्या नुसार मुद्देमाल जप्त केला आहे. तर सीडी अथवा कागदपत्र चोरी बाबत अद्याप पोलीस तपासात समोर आलेले नाही, त्याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं.
Raksha Khadse: याआधी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली. दरम्यान, 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. यामध्ये मुक्ताईनगर येथील रक्षा फ्युअल (केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप), कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद’ आणि तळवेल फाटा येथील ‘सय्यद पेट्रोल पंप’ या ठिकाणांचा समावेश होता.
त्या रात्री बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक (Special Investigation Team) स्थापन केले होते. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी नाशिक व अकोला जिल्ह्यात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली होती.
आणखी वाचा
















