एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Pune Crime Ganesh Kale: पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर

Pune Crime Ganesh Kale: पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळेची हत्या करण्यात आलीय. या हत्येत अल्पवयीन मुलांचा वापर करून घेण्यात आला.

Pune Crime Ganesh Kale: पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून शनिवारी गणेश काळेची (Ganesh Kale) हत्या करण्यात आलीय. या हत्येमध्ये देखील या टोळीयुद्धातील आधीच्या हत्यांप्रमाणे अल्पवयीन मुलांचा वापर करून घेण्यात आला. महत्वाचं म्हणजे आंदेकर टोळीचा प्रमुख कृष्णा आंदेकरला (Krushna Andekar) चौकशीसाठी तुरुंगातून पोलीस कोठडीत आणलेले असताना ही हत्या करण्यात आली. या हत्येमुळं पुण्यातील टोळीयुद्धाला लगाम घालण्यात पोलीस पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर अल्पवयीन गुन्हेगारांची समस्या किती गंभीर बनलीय हे देखील अधोरेखित झालं. 

पुण्याच्या येवलेवाडी भागात पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या गणेश काळेवर चौघांनी बंदुकीतून गोळीबार करून आणि धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या चार मारेकऱ्यांपैकी दोन मारेकरी हे अवघ्या सतरा वर्षांचे आहेत. तर अमन शेख हा 23 वर्षांचा, अरबाज शेख हा 24 वर्षांचा तर मयूर वाघमारे हा 23 वर्षांचा आहे. यामुळं आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचं दिसून आलंय. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आतापर्यंत चार हत्या झाल्यात आणि प्रत्येक हत्येत अल्पवयीन मुलांचा किंवा ज्यांनी नुकतीच वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, अशा मुलांचा वापर करून घेण्यात आलाय. 

Pune Crime: आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात अल्पवयीन मुलांचा वापर 

- 2 ऑक्टोबर 2023 ला पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीतील निखिल आखाडेची हत्या करण्यात आली. त्या हत्येत ज्या आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या त्यावेळी 17 वर्षे वय असलेल्या आरोपींचा समावेश होता. मात्र अल्पवयीन असल्याने दोघांची लगेच सुटका झाली. 

- निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2024 ला माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली. वनराजच्या हत्येतील 21 आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन होता तर दोन आरोपी 19 वर्षांचे तर तीन आरोपी वीस वर्षांचे होते.
 
- वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 4 सप्टेंबर 2025 ला आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. आयुषच्या हत्येमध्ये त्याच यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा समावेश होता ज्यांनी अल्पवयीन असताना निखिल आखाडेची हत्या केली होती. 

- तर 1 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या गणेश काळेच्या हत्येमधील चारपैकी दोन मारेकरी हे अल्पवयीन आहेत. 

Pune Crime: बंडू आणि कृष्णा तुरुंगात असतानाही टोळी सक्रीय  

ज्यांचं कुठेच गुन्हेगारी रेकॉर्ड नाही त्यांना आपलंस करायचं. त्यांना नवीन कपडे आणि थोडेसे पैसे द्यायचे. भावनिक करण्यासाठी धार्मिक गोष्टींचा आधार घ्यायचा ही सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरची कार्यशैली आहे. त्यामुळे बंडू आणि कृष्णा हे तुरुंगात असताना देखील त्याची टोळी बाहेर सक्रिय असल्याचं आणि हत्या घडवून आणत असल्याचं पाहायला मिळतंय. 

Krushna Andekar: कृष्णा आंदेकरच्या आदेशाने गणेश काळेची हत्या?

आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकर नंदुरबारच्या तुरंगात कैद आहे. मात्र  दुसऱ्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याला 29 ऑकटोबरला ताब्यात घेतलं आणि पुण्यात आणलं. त्यावेळी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथं पहाऱ्यावरील पोलिसांची नजर चुकवून त्याला कोणी भेटलं होतं का? आणि त्याच्या आदेशाने गणेश काळेची हत्या झाली का? याचा आता पोलीस तपास करतायत. 

Pune Police: टोळीयुद्धाला लगाम घालण्यात पोलीस अपयशी 

पुणे पोलिसांनी आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध संपवण्याच्या तसेच या टोळ्यांचं कंबरडं मोडलं जाईल, असा दावा करणाऱ्या अनेक घोषणा केल्या. पण पुण्यात टोळीयुद्धातून सुरु झालेलं हे हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळं पुणे पोलिसांनी फक्त माध्यमांसमोर मोठं मोठे दावे करण्याऐवजी प्रत्यक्षात कडक कारवाई करण्याची गरज पुणेकरांकडून व्यक्त होतेय. 

Pune Crime: तोपर्यंत गुन्हेगारीचं हे चक्र थांबण्याची चिन्ह नाही

दरम्यान, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य सध्या तुरुंगात आहेत. तरीही ही टोळी हत्या घडवून आणू शकते हे गणेश काळेच्या हत्येने स्पष्ट झालंय. पुणे पोलिसांसाठी हे अपयश आहेच. त्याचबरोबर पुण्यात बालगुन्हेगारीचा प्रश्न किती गंभीर बनलाय हे पुन्हा एकदा समोर आलंय. या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखणं ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही तर एक सामाजिक प्रश्न म्हणून त्याकडं पाहिलं जाण्याची गरज आहे. शाळा आणि रोजगार यांच्याशी हा प्रश्न निगडित आहे. जोपर्यंत त्या दिशेने प्रयत्न होणार नाहीत, तोपर्यंत गुन्हेगारीचं हे चक्र थांबण्याची चिन्ह नाही. 

आणखी वाचा 

Pune Crime Ganesh Kale: गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Probe: स्फोटासाठी वापरलेल्या i20 गाडीचा तपास NIA कडे, Faridabad CCTV मधून धागेदोरे.
Delhi Terror Plot: दिल्ली स्फोटात 6 डॉक्टरांची टोळी, आत्मघातकी हल्लेखोर Dr. Umar Mohammed ठार.
Delhi Blast Probe : स्फोटामागे 'डॉक्टर्स ऑफ डेथ'? NIA कडून Hyundai i20 गाडीचा तपास सुरू.
Delhi Blast :  दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ १२ जणांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश
Undertrial Prisoners : देशातील 70% कैदी अजूनही दोषी नाहीत, NALSAR विद्यापीठाच्या अहवालातून खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Embed widget