Bhandara Crime : धक्कादायक! संपत्तीच्या वादातून बापानं केली पोटच्या पोराची निर्घृण हत्या; घटनेनं परिसर हादरला
Bhandara Crime News: संपत्तीच्या वादातून बाप लेकांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की वादातून बापानं चक्क पोटच्या मुलावर कुऱ्हाडीनं वार करून त्याची निर्घृण हत्या (Crime News) केलीय.
Bhandara Crime News भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या रोंघा गावातून एक थरारक घटनेची बातमी समोर आली आहे. यात संपत्तीच्या वादातून बाप लेकांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की वादातून बापानं चक्क पोटच्या मुलावर कुऱ्हाडीनं वार करून त्याची निर्घृण हत्या (Crime News) केलीय. ही थरारक घटना भंडारा (Bhandara Crime) जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या रोंघा या गावात दुपारच्या सुमारास घडली.
एकनाथ ठाकरे (वय 40 वर्ष) असं मृतकाचं नाव आहे. तर, धनराज ठाकरे (वय 70 वर्ष) असं मारेकरी संशयित आरोपी बापाचं नाव आहे. धनराज यांचं टेलरिंगचा व्यवसाय असून मागील काही दिवसांपासून बाप- लेकांमध्ये संपत्तीचा वाद होता. आज दुपारी पुन्हा एकदा याच वादातून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. वाद इतका विकोपाला गेल्यानं वडिलांनी रागातून कुऱ्हाडीच्या सहाय्यानं मुलाची हत्या केली. सध्या पोलिसांनी संशयित आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. तर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र, या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे.
संपत्तीचा वाद विकोपाला, घरातील कुर्हाडीने मुलाला संपवलं
मिळालेल्या माहिती नुसार, भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा येथे संशयित आरोपी धनराज ठाकरे हे शेतीचे काम करीत होते. त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तर लहान मुलगा हा मुंबईला नोकरीवर आहे. वडील धनराज आणि त्यांचा मुलगा एकनाथ यांच्यामध्ये कौटुंबिक वादातून नेहमीच भांडण होत असे. दरम्यान, आज, 10 ऑगस्ट रोजी धनराज हा घरी आला असता मुलात आणि वडीलामध्ये पुन्हा कौटुंबिक वाद झाला. कालांतराने हा शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि वडीलाने घरातील कुर्हाडीने मुलाच्या मानेवर वार करुन त्याची हत्या केली.
घटनेनं परिसर हादरला
त्यानंतर क्षणात मुलगा एकनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकर्यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या बाबतची माहिती गोबरवाही पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच गोबरवाही ठाण्याचे ठाणेदार विनोद गिरी आणि आंधळगाव ठाण्याचे ठाणेदार पोनि सोनवाने, हे घटनास्थळावर दाखल झाले. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. तर या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या