एक्स्प्लोर

Dombivli News : चोरी करायला गेला आणि जीव गमावला; इमारतीच्या आठव्या माळ्यावरुन पडून मृत्यू

Dombivli News : चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार जखमी झाला आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली.

डोंबिवली : चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार जखमी झाला आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली. वॉचमन आपल्याला पाहिली आणि आपण पकडले जाऊन या भीतीने दोघांनी पाईपवरुन उतरण्याचा प्रयत्न केला. त्यातच हात सटकल्याने खाली पडून एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे.
 
डोंबिवली खंबाळपाडा इथल्या केडीएमसीच्या बीएसयूपीच्या इमारतीत वायरिंग चोरी करण्यासाठी दोन तरुण गेले होते. मात्र चोर शिरल्याचे लक्षात येताच वॉचमन इमारतीमध्ये गेला. वॉचमन आल्याचे लक्षात आल्याने घाबरलेल्या या दोघांनी इमारतीच्या पाईपवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघे खाली पडले. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. मोहम्मद सलिम भाटकर अस या मृत तरुणाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजनेअंतर्गत डोंबिवली खंबाळपाडा परिसरात इमारती उभारल्या आहेत. मात्र अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला नाही. या इमारती भग्नावस्थेत उभ्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून या इमारतींना चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे.  चोर या इमारतीच्या दरवाजे ग्रील चोरुन नेतात. अशाच प्रकारची चोरी करण्यासाठी दोन चोर इमारतीत गेले होते.

या इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग चोरी करण्यासाठी अरफाह पिंजारी आणि मोहम्मद भाटकर हे दोन तरुण काल रात्रीच्या सुमारास गेले. हे दोघे इमारतीमध्ये शिरल्याचे वॉचमनला लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघांनी घाबरुन इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यात हात निसटल्याने मोहम्मद भाटकर आणि पिंजारी दोघे खाली पडले. यामध्ये मोहम्मद भटकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर पिंजारी जखमी झाला आहे.

याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाटकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. मोहम्मद भाटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात याआधी देखील गुन्हे  दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Embed widget