Digital Rape Case : अल्पवयीन मुलीवर डिजिटल अत्याचार प्रकरणी 75 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा
अल्पवयीन मुलीवर डिजिटल बलात्कार (Digital Rape Case) केल्याप्रकरणी 75 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Digital Rape Case : अल्पवयीन मुलीवर डिजिटल बलात्कार (Digital Rape Case) केल्याप्रकरणी 75 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथील अकबर अली (Akbar Ali) असे या वृद्धाचे नाव आहे. ही घटना 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टरमधील 39 पोलीस स्टेशन परिसरात घडली होती. 21 जानेवारी 2019 रोजी मुलीच्या वडिलांनी अकबर अलीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयानं 75 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी सकाळी 11 वाजता मुलगी घराबाहेर खेळत होती. अकबरने त्याला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेले. त्यांनतर माझी मुलगी रडत घरी आली आणि तिने हा प्रकार आईला सांगितल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिल्याचे विशेष सरकारी वकील नीतू बिश्नोई यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूर गावातील सूरजपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर डिजिटल बलात्कार केल्याप्रकरणी 75 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार सिंग यांच्या न्यायालयाने पुरावे आणि आठ साक्षीदारांच्या आधारे अलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या व्यक्तीवर POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 375 आणि 376 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
2019 मध्ये अकबर अली आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी नोएडामधील सालारपुल गावात आला होता. यावेळी त्याने शेजारच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचा बहाणा केला. त्याच्या घरातच त्याने मुलीवर डिजिटल रेप केला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी त्याविरोधात पोलिसात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, त्यामध्ये बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. तेव्हापासून अली जिल्हा कारागृहात आहे. त्याला कोणताही अंतरिम जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर आता न्यायालयानं अकबर अलीला जन्मठेपेसह 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान, याप्रकरणी अकबरच्या नातवाने सांगितले की, माझ्या आजोबांवर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती त्याने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- NCRB 2021 : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
- Pune Crime News: अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी दिली महिलेला धमकी; महिलेची पुन्हा पोलिसात धाव