Pune Crime News: अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी दिली महिलेला धमकी; महिलेची पुन्हा पोलिसात धाव
त्रास सहन न झाल्याने 42 वर्षी पीडितेला पुन्हा एकदा पोलिसांत धाव घ्यावी लागली आहे. याप्रकरणी तीस वर्षीय नासीर सलाम सौदागर याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News: पुण्यात अत्याचार(Pune) पीडितेचा आरोपींनी वारंवार पाठलाग करून गुन्हा मागे घेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीवर काही दिवसांपुर्वी गुन्हा (Pune crime) दाखल झाला होता. मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी पीडितेला त्रास देत होता. हा त्रास सहन न झाल्याने 42 वर्षी पीडितेला पुन्हा एकदा पोलिसांत धाव घ्यावी लागली आहे. याप्रकरणी तीस वर्षीय नासीर सलाम सौदागर याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं होतं?
फिर्यादीने नसीरविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्यात त्याला अटकही झाली होती. सध्या या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मात्र आरोपी पीडितेचा छळ करतो आहे. तिला अर्वाच्च भाषेत बोलत आहे, तिच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करत आहे, असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
सहा महिन्यापासून पाठलाग
अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी वैतागला होता. नसीर गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता. तिला त्रास देत होता. तिला धमकावण्याचाही प्रयत्न त्याने बऱ्याचदा केला होता. मात्र ज्यावेळी त्याने अश्लील भाषा वापरण्याला सुरुवात केली त्यावेळी मात्र महिला वैतागली तिने पोलिसांत थेट तक्रार दाखल केली.
सोशल मीडियापासून सतर्क रहा
पुण्यात महिलांबाबत घडत असलेल्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे. मागील काही महिन्यात रोज अशा अत्याचाराच्या आणि छेडाछेडीच्या अनेक तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिस देखील चांगल्यापद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात. मात्र तरी देखील या आरोपींमध्ये कशाचीच भीती उरली नसल्याचं चित्र आहे. अत्याचार, लैंगिक छळाचं प्रमाण हे सोशल मीडियाच्या मार्फत जास्त वाढत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अनेकदा महिलांना टेक्नॉलॉजी फार हाताळता येत नाही. त्याचा वापर करुन हे आरोपी महिलांना जाळ्यात अडकवण्याचं काम करतात. त्यावर चॅटींग करुन वेगवेगळ्या वस्तुंचं, लोनचे किंवा विविध प्रकारचे आमिष दाखवून महिलेला जाण्यात खेचलं जातं. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्तापित केले जातात. दोन दिवसांपुर्वीच डेटींग अॅपवर ओळख झालेल्या व्यक्तीने फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियाच्या जगात महिलांना सतर्क राहिलं पाहिजे आणि याचा योग्य पद्धतीने वापर करुन कोणत्याच आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.