एक्स्प्लोर

Dhule Crime News : सनी साळवेच्या चार मारेकऱ्यांना दुहेरी जन्मठेप; ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत जन्मठेपेच्या शिक्षेचे राज्यातील पहिलीच घटना

Dhule Sunny Salve Case : सनी साळवे हत्या प्रकरणी आज धुळे कोर्टाने निकाल सुनावला. चार आरोपींना कोर्टाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Dhule Sunny Salve Case :  धुळे शहरात एप्रिल 2018 मध्ये झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या हत्ये प्रकरणातील चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने (Dhule Court) आज या प्रकरणात निकाल दिला. सनी साळवे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत (Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रकरण काय?

धुळे शहरात 18 एप्रिल 2018 रोजी देवपूरात असलेल्या नरसिंह बियर बार जवळ गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. सनी साळवे, सुमेध सूर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी उपचारांसाठी रुग्णालयात गेल्यानंतरही त्यांना आरोपींनी त्या ठिकाणी जाऊन मारहाण करत धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या मारहाणीत सनी साळवे या 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांची हत्या झाली होती. 

अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

सनी साळवेच्या हत्ये प्रकरणी धुळे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. न्यायाधीश डी. एम. अहिरे यांनी या हत्ये प्रकरणी दिलेल्या निकालात यातील चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेतील आठ आरोपींपैकी चार जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून उर्वरित तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Atrocities) शिक्षा सुनावण्यात आली  आहे. दीपक फुलपगारे, जितेंद्र फुलपगारे, गुडया उर्फ मयूर फुलपगारे आणि  वैभव गवळे या आरोपींना दुहेरी शिक्षा सुनावण्यात आली. तर,  प्रशांत उर्फ भैया बाविस्कर, दिपक उर्फ सनी सानप  आणि गोपाल चौधरी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

सनीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर

विशेष म्हणजे या प्रकरणात जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार  जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा पद्धतीने शिक्षा सुनवण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या निकालानंतर सनी साळवे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. सनीच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त केले.  सनी साळवे हत्या प्रकरणी काय निकाल लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. 

 इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget