एक्स्प्लोर

Thane Crime : तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, पतीने आधी बायकोला संपवलं, नंतर दोन मुलांचाही घेतला जीव

Thane Crime : ठाण्यातील कासारवडवली भागात धक्कादायक घटना घडली. पतीने बायको आणि 2 लहान मुलांची हत्या केली. डोक्यात क्रिकेटची बॅट मारून  हत्या केली.

ठाणे : तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला आहे. पतीने क्रिकेटच्या बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. कासारवडवली येथे ही धक्कादायक घटना घडली. आरोपीचे नाव अमित धर्मवीर बागडी असे आहे. मागील तन दिवसांपासून तो भाऊ विकास घधर्मवीर बागडी याच्याकडे राहत होता. 29 वर्षीय अमित याने बायको आणि दोन मुलांना क्रिकेटच्या बॅटने संपवलं. जयवंत निवृत्ती शिंगे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्यानंतर आरोपी अमित हा पळून गेलेला आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

 आरोपी अमित धर्मवीर बागडी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर येथील आहे. तो तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता. अमित बागडी याला दारुचं व्यसन होतं. तो कोणताही व्यावसाय करत नव्हता. घरगुती कारणामुळे हत्या झाल्याचं प्रथमिक महितीमधून समोर आलेय. 29 वर्षीय अमित बागडी याने पत्नी भावना हिला आधी संपवलं. भावनाचं वय 24 वर्ष इतकं होतं. त्यानंतर सहा वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलालाही संपवलं. 

आरोपीला दारुचं व्यसन - 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास धर्मवीर बागडी  हा आरोपीचा सख्खा भाऊ असून तो ठाण्यात साईनगर कासारवडवली येथे 2 वर्षे राहिला होता. त्यानंतर  
जयवंत शिंदे चाळ रूम नंबर एक कासारवडवली गाव येथे गेले 7 वर्षापासून राहत आहे. मयत व्यक्ती या आरोपी अमितची पत्नी आणि मुलं आहेत. आरोपी अमित बागडी याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे पत्नी भावना आणि अमित यांच्यात वारंवार भांडणं होतं होती. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे ती त्याला सोडून विकास बागडी सोबत राहत होती.

पोलिसांनी काय माहिती दिली ?

मयत व्यक्ती भावना ही सख्या लहान दिरासोबत वास्तव्यास राहत होती.  घटना घडली त्या ठिकाणी दोन मुलांचे सोबत राहत होती. गेले तीन दिवसापासून आरोपी मयत व्यक्ती हिचा पती आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून घरी आला होता. त्यांच्यासोबत  तो राहत होता. आज सकाळी आरोपीचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्याच्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावना तसेच दोन मुले हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. कासारवडवली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Embed widget