एक्स्प्लोर

Dharashiv Crime News : शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ

Dharashiv Crime News: जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे.

Dharashiv Crime News: धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील खामसवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा काटा काढला आहे. विलास शेळके असे आरोपी चुलत्याचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुण पुतण्यावर चाकूने वार करत त्याचे आयुष्य संपवले.

Dharashiv Crime News: जमीन व्यवहाराचा जुना वाद

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि मयत सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून मागील काही काळापासून वाद सुरू होता. या वादातून विलासच्या मनात पुतण्याबद्दल प्रचंड राग होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हा राग अनावर झाला आणि एका भीषण घटनेत त्याचे रूपांतर झाले.

Dharashiv Crime News: भररात्री झोपेतच हल्ला

घटनेच्या रात्री सुजित हा आपल्या आजी-आजोबांसोबत झोपलेला होता. यावेळी आरोपी विलास तिथे आला आणि त्याने सुजितला उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळीचे रूपांतर वादात झाले आणि काही समजण्यापूर्वीच विलासने आपल्याकडे असलेल्या चाकूने सुजितच्या पोटावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा मृत्यू झाला. 

Dharashiv Crime News: आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

भररात्री घडलेल्या या प्रकारामुळे खामसवाडी गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत सुजित शेळके याच्या आईने दिलेल्या जवाबावरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सख्ख्या चुलत्यानेच जमिनीच्या हव्यासापोटी पुतण्याचा काटा काढल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. शिराढोण पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला असून आरोपीला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Yavatmal Crime: सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश

Amravati Crime News: हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget