एक्स्प्लोर

Yavatmal Crime: सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश

Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहीती हाती आली आहे.

Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी (Yavatmal Crime News) केली जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) समोर आली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी (Crime News)केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा प्रफुल चव्हाण यांनी केला आहे. अशातच, चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली असून मंत्री डॉ. अशोक उईकेंनी (Ashok Uike) या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

Ashok Uike : आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल, अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पोलीस अधीक्षक अशोक थोरातांना या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या आहे. मात्र आदिवासी मंत्र्यांच्या तक्रारीनंतरही अजून या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मंत्री अशोक उईकेंची उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाली असून या प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगानं तपास करा, अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई केली जाते, आणि तपासाअंती नेमकी काय माहिती समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Yavatmal Crime भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून गंभीर आरोप, गृह विभागकडे दिली माहिती

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. त्यांनतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना त्याला पुन्हा पकडले गेले. यात पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांना तपासापासून दूर ठेवावे, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यात आदिवासी मुलींना त्याच्या पालकांना पैश्याचे आमिष देऊन अश्या पध्दतीने फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब आहे. आम्ही गृह विभागकडे याबाबत माहीती दिली आहे. राज्य सरकार सुद्धा गंभीर आहे. यात लवजिहाद, धर्मांतर असा अँगल असू शकतो, याचे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.

Yavatmal Crime News:  या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?

मुलगा - काय म्हणता.

मुलगी - पोरीचं काम घेऊन चाली मी पुण्याले.

मुलगा - अच्छा..अच्छा

मुलगी - एकटी नाही, तर काय दहा जण नेणार का?...शुभम मामा, आहे.. पोरी काढणारा.

मुलगा - शुभम मामा कोण... कुठला आहे?

मुलगी - आपल्याच गावातला आहे. फुकटनगरचा..

मुलगा - ते कल्याणी आत्या काम करते काम..

मुलगी - हो

मुलगा - तिने काम सोडलं?

मुलगी - नाही

मुलगा - आपल्या गावात दिसते ती घराजवळ.. कल्याणी आत्या

मुलगी - मोबाईलवर काम करते

मुलगा - अच्छा... असं आहे का?

मुलगी - तिला जेल झाली होती या कामसाठी, तेव्हापासून मोबाईलवर काम करते. तीच निल झालं कि जाईल ती आता..

मुलगा - तीच नवरा?

मुलगी - बाप कल्याणी आत्याचा लग्न करून दिल होतं.. ते निघाली होती..

मुलगा - मजहर कुरेशी

मुलगी - हो, त्याचं दिल होत करून. खतरनाक काम आहे..

मुलगा - मदन कुरेशी हे काम करते

मुलगी - हो, ते कुरेशी करते काम, पैसा लय आहे पण बद्दूव्वा लागते..

मुलगा - तुला काय वाटे चागलं काम आहे का?

मुलगी- मला चागलं नाही वाटत, सांगत आहे.. पैसा भेटे पण बद्दूव्वा लागते..

मुलगा - अच्छा मग तिघ चौघे आहे, पोरी काढण्यात आणि विकण्यात..

मुलगी - बापरे तिघ, तिघ चौघे नाही, लई जण आहे.. यात काम करते रॅकेट आहे.. पूनम अत्या आहे. किती जण आहे सांगू शकत नाही..

मुलगा - बापरे......

मेन कोण आहे...

मुलगी - यात मेन कोण नाही..यात काम लावणारे मेन आहे...

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप, क्लिनिक बंद करुन डॉक्टर फरार
भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप, क्लिनिक बंद करुन डॉक्टर फरार
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
सुपारी देऊन भावानेच काढला सख्ख्या भावाचा काटा, भिवंडी हत्या प्रकरणाचा छडा, चार आरोपींना अटक
सुपारी देऊन भावानेच काढला सख्ख्या भावाचा काटा, भिवंडी हत्या प्रकरणाचा छडा, चार आरोपींना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Devendra Fadnavis : जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी, पार्थ पवारांची भेट ते मनोज जरांगेंचं आंदोलन, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
Embed widget