एक्स्प्लोर

Amravati Crime News: हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स

Amravati Crime News: अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्याबद्दल दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Amravati Crime News: अमरावतीच्या परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्याबद्दल दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. केवळ मित्रांमध्ये फुशारकी मारण्यासाठी आणि आपल्या विकृत शौकासाठी अयानने अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अयानला मुलींशी जवळीक साधण्यासाठी टिप्स देणारा एक 'लव्ह गुरु' देखील तपासादरम्यान समोर आला आहे.

Amravati Crime News: 'लव्ह गुरु'ची विचित्र शिकवण

अयानला मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसे ओढायचे, याचे धडे देणारा एक 'लव्ह गुरु' होता. तो अयानला शिकवायचा की, मुलींना कधीही 'हाय-हॅलो' असे साधे मेसेज करायचे नाहीत. त्याऐवजी त्यांना उत्तर देण्यास भाग पाडणारा एखादा प्रश्न विचारायचा. उदाहरणार्थ, "आप वही हो ना, जो वहा मिले थे?" (तुम्ही तेच ना, जे तिथे भेटले होते?) असा प्रश्न विचारून तो मुलींना चॅटिंग करण्यास भाग पाडत असे. एकदा का संभाषण सुरू झाले की, तो हळूहळू त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा.

Amravati Crime News: 500 रुपयांत मिळायचा विकृत कारनाम्यांसाठी फ्लॅट

अयानने आपल्या विकृत कारनाम्यांसाठी अमरावती शहरातील एका फ्लॅटचा वापर केला होता. मानव सुगंधे या मित्राच्या फ्लॅटवर तो वर्षभरात 7 ते 8 वेळा मुलींना घेऊन गेला होता. पीयूष नावाच्या एका मध्यस्थी मित्राच्या मदतीने अयान आणि मानव यांची ओळख झाली होती. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन अयान या फ्लॅटमधील खोलीचा वापर करत असे. पोलिसांनी आता मानव सुगंधेलाही अटक केली आहे.

Amravati Crime News: कॅफेमधील आक्षेपार्ह वर्तन आणि पोलिसांचा शोध

केवळ फ्लॅटवरच नाही, तर अमरावती शहरातील दोन आणि परतवाडा येथील तीन नामांकित कॅफेमध्येही अयानने मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे समोर आले आहे. पोलीस आता या पाचही कॅफे चालकांचा आणि तिथल्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करुन देणारा, तर उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत.

आणखी वाचा 

Amravati Crime News: 'हे' एक वाक्य बोलून अयान मुलींना हेरायचा, इन्स्टाग्रामवर 18 हजार फॉलोअर्स, अमरावती व्हिडीओकांड प्रकरणाचा पर्दाफाश कसा झाला?

महत्त्वाच्या बातम्या

पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Akola Crime News: भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Embed widget