(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Crime : लेकीचे स्नॅपचॅट फोटो पाहताच आईला बसला शॉक! सायबर सेलकडे तक्रार, ट्रुथ अँड डेअर गेमचा प्रकार
Delhi Crime : या पीडित विद्यार्थीनीशिवाय आरोपीनी इतर कोणालाही ब्लॅकमेल केलंय का? पोलीस आरोपीच्या मोबाइल फोनची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत.
Delhi Crime : आजच्या डिजीटल युगात स्मार्टफोन (Smartphone) एक काळाची गरज बनत चाललाय. ऑनलाइन अभ्यासामुळे (Online Study) पालकांनी आपल्या मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला होता. एके दिवशी मुलीच्या आईने आपल्या मुलीचा फोन चेक केला आणि तिच्या स्नॅपचॅट प्रोफाईलमध्ये मुलीचे फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली, त्यावेळी आईने तत्काळ सायबर सेलकडे तक्रार केली. दिल्ली पोलिसांनी चौकशी करताच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शाळकरी मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 27 वर्षीय सुभान अली याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. ज्याने शाळकरी मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बनावट आयडीने स्नॅपचॅटवर त्याचे प्रोफाईल तयार केले आणि या आयडीद्वारे त्याने शाळकरी मुलीशी मैत्री केली, त्यानंतर तिच्यासोबत ट्रुथ अँड डेअर गेम खेळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला समजू शकले नाही की ती सायबर ठगांच्या जाळ्यात अडकत आहे. गेमच्या नावाखाली आरोपींनी पीडितेचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. तर, आरोपीने पीडितेला गेमच्या नावावर आमिष दाखवले आणि नंतर तिला डेअर म्हणजेच धाडस करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडितेचे न्यूड फोटो आणि फोटो काढले.
एके दिवशी मुलीच्या आईने आपल्या मुलीचा फोन चेक केला
पोलिसांना ही तक्रार 20 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाली. जेव्हा एका वडिलांनी दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील सायबर पोलिस स्टेशन गाठले. तक्रार दाखल केली की, कोणीतरी त्याच्या मुलीला धमकावत आहे आणि ब्लॅकमेल करत आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ऑनलाइन क्लासेसमुळे पालकांनी आपल्या मुलीला स्मार्टफोन दिल्याचे सांगितले जात आहे. एके दिवशी मुलीच्या आईने आपल्या मुलीचा फोन चेक केला आणि तिच्या स्नॅपचॅट प्रोफाईलमध्ये मुलीचे नग्न फोटो, व्हिडिओ पाहिले. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
POCSO आणि 354 IPC च्या कलमांखाली एफआयआर
दक्षिण पश्चिम जिल्ह्याचे डीसीपी रोहित मीना यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त होताच दिल्ली पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात POCSO आणि 354 IPC च्या कलमांखाली एफआयआर नोंदवला. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या टीमने आधी आरोपीचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासले आणि हे प्रोफाईल बनावट आयडीवर तयार केल्याचे आढळले.
पोलिसांनी आरोपीचा स्मार्टफोनही जप्त केला
यानंतर पोलिसांना आरोपी उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमध्ये असल्याचे समजले. यानंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक तात्काळ उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमध्ये पोहोचले. त्यानंतर वेगवेगळ्या भागात छापे टाकल्यानंतर पोलिसांचे पथक 27 वर्षीय सुभान अलीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा स्मार्टफोनही जप्त केला आहे, ज्याद्वारे तो स्नॅपचॅट आयडी वापरत होता. दिल्लीतील या पीडित विद्यार्थीनीशिवाय सुभानने इतर कोणालाही ब्लॅकमेल केले आहे का, हे शोधण्यासाठी दिल्ली पोलिस आरोपीच्या मोबाइल फोनची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत.
हेही वाचा>>>
Bengaluru Blast : आधी इडली ऑर्डर, मग घडवला 'स्फोट, 56 मिनिटांचा कट! बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपीचा शोध सुरू