एक्स्प्लोर

Bengaluru Blast : आधी इडली ऑर्डर, मग घडवला 'स्फोट, 56 मिनिटांचा कट! बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपीचा शोध सुरू

Bengaluru Blast : बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींचा शोध सुरू आहे. डोक्यावर टोपी, तोंडावर मास्क, डोळ्यांवर चष्मा आणि पाठीवर बॅग. ही त्याची एकमेव ओळख आहे.

Bengaluru Blast : नाव- अज्ञात, वय- 28-30 वर्षे, पत्ता- अज्ञात, आरोप- रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट. बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwar Cafe Blast) झालेल्या स्फोटातील तो मुख्य आरोपी आहे. याच व्यक्तीने कॅफेमध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. डोक्यावर टोपी, तोंडावर मास्क, डोळ्यांवर चष्मा, खांद्यावर बॅकपॅक आणि नेहमीपेक्षा वेगाने चालणे. या व्यक्तीचे नाव कोणालाच माहीत नाही, हीच या संशयिताची ओळख आहे. या व्यक्तीने कॅफेच्या वॉश बेसिनमध्ये बॉम्ब ठेवला आणि नंतर तेथून निघून गेला. तिथून निघताच मोठा स्फोट झाला. ज्या पद्धतीने या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना धक्काच बसला. यात दहशतवादी कारस्थान आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.

टोपी घातलेल्या व्यक्तीची छायाचित्रेही CCTV मध्ये कैद

ही व्यक्ती शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता राममेश्वरम कॅफेमध्ये दाखल झाली. 11:38 वाजता तो रवा इडली ऑर्डर करतो. यानंतर तो हात धुण्यासाठी वॉश बेसिनकडे जातो. तोपर्यंत 11.44 वाजले होते. तो तिथे बॉम्ब ठेवतो आणि पटकन बाहेर निघून जातो. त्यावेळी 11.45 वाजले होते. तो बाहेर गेल्यानंतर 12.56 वाजता कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला. टोपी घातलेल्या या व्यक्तीची छायाचित्रेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहेत. कॅफेच्या आत, या व्यक्तीने तोंडावर मास्क घातला आहे आणि त्याच्या हातात रवा इडली आहे.

कॅफेमधून बाहेर पडल्यानंतर हा संशयित कुठे गेला? 

राममेश्वरम कॅफेच्या बाहेर हा स्फोट झाला. हा बॉम्ब कॅफेच्या बाहेर ठेवण्यात आला होता. त्यामुळे नुकसान कमी झाले. कॅफेमधून बाहेर पडल्यानंतर हा संशयित कुठे गेला? स्फोटानंतर तो कुठे लपला आहे? याचा शोध घेण्यासाठी एनआयए, एनएसजी आणि कर्नाटक पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. रामेश्वरम कॅफेच्या आजूबाजूला जे काही सीसीटीव्ही आहेत. त्यांच्यामार्फत सुगावा शोधण्यात येत आहे. बसमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात असल्याचे कर्नाटकच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले. कदाचित त्याने बस पकडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय

स्फोटात आयईडीचा वापर, दहशतवाद्यांचे काही मोठे षडयंत्र होते का? 

या स्फोटाच्या आतापर्यंत केलेल्या तपासात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला आहे. पण प्रश्न असा आहे की आयईडी आली कुठून? यामागे काही मोठे षडयंत्र आहे का? हे कोणत्याही दहशतवादी संघटनेने प्रायोजित केले आहे का? त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे ती व्यक्ती कुठून आणि कशी आली? हा भयंकर कारस्थान करून तो कुठे गायब झाला? त्याची ओळख का होत नाही? देशातील सर्वात हायटेक शहरात तो कुठे लपला आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, 2022 मध्ये मंगळुरूमध्येही स्फोट झाला होता. यामध्ये आयएसआयचा हात होता. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या तपासात एजन्सी कोणताही पुरावा सोडू इच्छित नाहीत. या प्रकरण दुवे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच राज्य पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि एनएसजी या स्फोटाच्या तपासात गुंतले आहेत.

स्फोटात 10 जण जखमी

रामेश्वरम कॅफे हे बेंगळुरू शहरातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. येथे झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. स्फोट होताच आतील भागात धुराचे लोट पसरले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. एकेकाळी लोकांना वाटले की कदाचित हा सिलेंडरचा स्फोट असावा, पण पोलिस आणि एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर संशयाची सुई दुसरीकडे वळली. पोलिसांनी संपूर्ण कॅफे सील केले. फॉरेन्सिक तपास सुरू आहे. शनिवारी सकाळी एनएसजीची टीमही रामेश्वरम कॅफेमध्ये पोहोचली. एनएसजीने संपूर्ण कॅफेची झडती घेतली, बॉम्बशोधक पथकाने कॅफेच्या आत आणि बाहेर तपास केला. झडतीदरम्यान स्फोटात वापरलेली बॅटरी आणि टायमर जप्त करण्यात आला आहे. कॅफेची तपासणी करण्यासाठी चेन्नईहून श्वानपथक पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनीही तपास सुरू केला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

हेही वाचा>>>

Bengaluru Blast : 'आईचा फोन आला नसता तर, आज मी जगात नसतो...', बेंगळुरू स्फोटाच्या साक्षीदाराने सांगितला थरारक अनुभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget