एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Cyber Security : आॅनलाईन सर्च करताना सावधान! डाॅक्टरांची खोटी अपॉईंटमेंट देऊन वकिलाला 99 हजाराचा गंडा

दिल्लीत एका सरकारी वकिलाला डाॅक्टरांची खोटी अपॉईंटमेंट देऊन तब्बल 99 हजाराचा गंडा लावला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हॉस्पिटलचा नंबर मिळाला होता, मात्र एका चुकीमुळे वकिलाचे हजारोचे नुकसान झाले आहे. 

Tips For Cyber Security : सध्याच्या काळात मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र याच माध्यमातून लोकांना फसवण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका सरकारी वकिलाला डाॅक्टरांची खोटी अपॉईंटमेंट देऊन तब्बल 99 हजाराचा गंडा घातल्याचं समोर आलंय. संबंधित वकिलाला इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून हॉस्पिटलचा नंबर मिळाला होता, मात्र एका चुकीमुळे त्याचे हजारोचे नुकसान झाले आहे. 

हे डिजिटल युग फार पुढे गेले आहे. याचा जेवढा फायदा लोकांना होतो तेवढेच नुकसान देखील होते. आजकाल स्कॅमर्स (Scammer) प्रत्येक वेबसाईट्सवर लोकांना फसवण्यासाठी जाळे टाकतात. डिजिटल होत असणाऱ्या या जगात तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका सर्चवर मिळतात. असेच एका वकिलाने डाॅक्टरच्या अपाॅईंटमेंटसाठी नेहमीप्रमाणे इंटरनेटवर सर्च केले. आलेल्या सर्चवरून त्याने त्या नंबरवर काॅल केला त्याच्या फोनवर एक ओटीपी आला. ओटीपी आल्याच्या काही मिनिटातच त्या वकिलाच्या बँक खात्यातून तब्बल 99 हजार रूपये उडाले. त्यांना मिळालेला नंबर हा रूग्णालयाचा नसून घोटाळेबाजांचा असल्याचे त्यांना लक्षात आले. घोटाळेबाजाने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . तपासात असे आढळून आले आहे की, आरोपी एक टोळी चालवत होता, जो इंटरनेटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करायचा.

सामान्य लोकांना कसे फसवले जाते

स्कॅमर सर्व लोकप्रिय रुग्णालये आणि इतर सेवांसाठी बनावट वेबसाइट तयार करतात. केवळ हॉस्पिटलसाठीच्याच नाही तर अनेक खोट्या वेबसाईट्स ते तयार करतात. वापरकर्त्याने या सेवा किंवा कीवर्डशी संबंधित शोध घेताच, त्यांना सर्चमध्ये या बनावट वेबसाइट्स देखील दिसतात. यानंतर यूजर्स दिलेल्या नंबरवर काॅल करतात आणि इथूनच खऱ्या गेमला सुरूवात होते. स्कॅमर लोक विविध पद्धतीने लोकांच्या खात्यांंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. वकिलाच्या प्रकरणात घोटाळेबाजांनी रिमोट अॅक्सेस अॅप्लिकेशन डाऊनलोड केले होते. या प्रकारच्या अॅप्लिकेशनचा वापर करून त्यांना तुमच्या फोनमधील एक ना एक डिटेल्स मिळतात. मिळालेल्या डिटेल्सचा वापर करून ते तुमच्या खात्यातील पैसे काढतात. 

स्कॅमपासून स्वत:ला कसे वाचवावे?

- तुम्ही जेवढे सतर्क राहाल तेवढे सुरक्षित राहाल.

- शक्यतो अधिकृत साईटवरूनच तुम्हाला हवे असणारे नंबर मिळवण्याचा प्रयत्न करा.

- तुमची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका.

- कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. 

-  कोणाच्या सांगण्यावरून अनोळखी अॅप्स डाउनलोड करू नका.

- आवश्यक असल्यास प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून कोणत्याही सेवेसाठी अॅप डाउनलोड करा. 

- घोटाळेबाजांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून अॅप डाउनलोड करू नका.

- तुमचा OTP कधीही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका. 

इतर महत्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar : शेतीच्या वादातून वाद झाला, लहान भावाने केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा घात झाला

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Embed widget