एक्स्प्लोर

मीरा रोड सायबर सेलची कौतुकास्पद कामगिरी, आतंरराष्ट्रीय गुन्ह्याची उकल

Cryptocurrency Fraud Cases : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम सेलने देशातील पहिल्या क्रिप्टो चलन संबंधीत फसवणूक झालेल्या पिडिताचे पैस परत मिळवून दिले आहेत.

Cryptocurrency Fraud Cases : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम सेलने देशातील पहिल्या क्रिप्टो चलन संबंधीत फसवणूक झालेल्या पिडिताचे पैस परत मिळवून दिले आहेत.  पिडीतने अधिक नफ्याच्या हव्यासापोटी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले होते. माञ अखेर पिडीत यात फसला गेला. आतंरराष्ट्रीय गुन्ह्याची उकल देशात पहिल्यादांच मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलने केली आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये दिवसेंदिवस अनेकजण गुतंवणुक करत आहेत, माञ यात गुंतवणूक करताना. थोडीशी सावधगिरी बाळगणं गरजेच आहे. मुंबई जवळच्या मिरा रोडमध्ये मोबाईल दुकानाचे व्यापारी योगेश जैन यांना व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्याची ऑफर आली होती. त्यांनी बी.टी.सी ट्रेड इंडिया या ग्रुपमध्ये जॉईंट होवून, बी.टी. कॉईन ऍप डाउनलोड केलं. आणि अँमीच्या सांगण्यावरु पैसे गुंतवू लागला काही दिवस चांगला परतावा आला. माञ त्यानंतर जैन चांगलेच तोटयात गेले. त्यानंतर अँमीने तोटा भरुन काढण्यासाठी तिचा मिञ मार्कचा नंबर दिला. त्याने ही चांगल्या परताव्याची हमी देत. आपणाला नफ्यातून २० टक्के कमिशन देण्याची मागणी केली. आणि मध्येच पैसे काढू शकत नाही, असे सांगितले. जैन यांनी आपल्या खात्यातून १५ लाख टाकले. मिञांकडूनही ५ ते ६ लाख टाकले. असे पैसे टाकत एकूण ३३,६५,६५० एवढे या क्रिप्टोकरन्सीमध्ये जैन यांनी गुंतवले. नफा करोडो मध्ये दाखवत होता. माञ पैसे एका विशिष्ट दिवसानंतर काढायचे ठरले होते. ज्यावेळी रक्कम काढण्याची वेळ आली तेव्हा ते अकाउंटच बंद झालं.

आपली फसवणूक झाल्याच कळताच योगेश जैन यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम सेल कडे मेल द्वारे तक्रार केली. सायबर क्राईम सेलने या तक्रारीची दखल घेत. गुन्हा दाखल केला. आणि या घटनेचा एक वर्ष कसून तपास केला. यात दोन चिनी नागरिकांचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. ते दोघेही हॉंगकॉंग येथून, गुन्हा करत होते. सायबर सेलला  तपासात  ओकेएक्स (OKX) नावाच्या एका एजन्सीचा तपास लागला. जी एजन्सी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचं काम करत होती. याच तपासा दरम्यान पोलिसांना एका फेक क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा शोध लागला. पोलिसांनी ओकेएक्स एजन्सीशी संपर्क केला असता हा वॉलेट त्याच चीनी नागरिकाचा असल्याचे उघडकीस आले. तसेच, पीडित फिर्यादी व्यक्तीस ज्या मोबाईल नंबरवरुन संपर्क करण्यात आला होता, ते नंबरही हाँगकाँगचे असल्याचे पोलीस तपासात निष्पण झालं.  त्यानंतर पोलिसांनी दोन चिनी नागरिकां वर 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला, या दोन्ही चिनी नागरिकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. माञ सायबर क्राईम सेलने याचा पाठपुरावा करत, योगेश जैन याचे संपूर्ण पैसे परत मिळवून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget