एक्स्प्लोर

घरी बोलवून आधी दारुची पार्टी दिली अन् नंतर कोयत्याने वार केले, कल्याणमध्ये मित्राकडून मित्राची हत्या 

Crime News : उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने मित्राने मित्राची हत्या केली आहे.  बिपिन दुबे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

मुंबई :  कल्याण पूर्वेतील तिसगावनाका येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.  उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने मित्राने मित्राची हत्या केली आहे.  बिपिन दुबे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर  राजेश्वर पांडे असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित पांडे याला ताब्यात घेतले आहे. कोयत्याने वार करून ही हत्या करण्यात आलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वर पांडे याने त्याचा मित्र बिपिन दुबे याची कोयत्याने वार करत  हत्या केली आहे.  ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात आज दुपारच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात राजेश्वर पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्व परिसरात तिसगाव नाका येथील एका इमारतीमध्ये राजेश्वर पांडे राहतो. याच परिसरात राहणारा बिपिन दुबे हा राजेश्वर पांडे याचा मित्र होता. बिपिन दुबे याने काही महिन्यांपूर्वी राजेश्वर पांडे याच्याकडून काही कामानिमित्त साडे चार लाख रुपये  उसने घेतले होते.  राजेश्वर याने अनेक वेळा बीपीनकडे पैशांची मागणी केली. मात्र बिपिन टाळाटाळ करत होता. आज दुपारी राजेश्वर याने बिपिनला घरी  बोलावलं. दोघांनी दुपारच्या सुमारास  मटन खाल्लं, मद्यपान केलं.  त्यानंतर राजेश्वरने बिपीनकडे पैसे मागितले. परंतु, यामुळे दोघांमध्ये  वाद झाला. या वादातून राजेश्वरने बिपिनवर कोयत्याने वार करत बीपीनची हत्या केली. 

संशयिताने स्वत: पोलिसांना दिली माहिती
धक्कादायक बाब म्हणजे राजेश्वर याने बिपीन याची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:  कोळशेवाडी पोलिस ठाण्यात फोन करून मी बिपीनची हत्या केल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत बीपीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आरोपी राजेश्वर पांडे याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली.  

महत्वाच्या बातम्या 

गुजरातमध्ये ड्रग्ज तयार करायचा अन् मुंबईत विकायचा, 7000 कोटींचं ड्रग्ज बनवणाऱ्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मापात पाप! शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ, 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ, शिक्षकाने केला भांडाफोड  

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget