एक्स्प्लोर

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं

Navy Nagar Sailor Family Death : मुंबईतील नेव्ही नगर येथील सामूहिक मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. नौदल जवान पुरणमल मेहरा याने पत्नी व दोन मुलांना संपवल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे.

Navy Nagar Case Update : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला असून या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. नौदलातील जवान पुरणमल मेहरा यानेच आपली पत्नी ओमा आणि दोन लहान मुलांना संपवल्यानंतर स्वतःलाही संपवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नी आणि मुलांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पुरणमलने पत्नी ओमा आणि दोन महिन्यांचा चिमुकला मुलगा दर्श यांना उशीने तोंड दाबून श्वास गुदमरवून संपवलं. तर मोठा मुलगा यश याला विषारी औषध देऊन मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर पुरणमलने हॉलमध्ये स्वतःच्या गळ्याला नायलॉनचा दोर लावला.

Navy Nagar Crime Details : घटनेपूर्वी वडिलांना पाठवला व्हॉट्सॲप मेसेज

या भीषण हत्याकांडापूर्वी 14 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास पुरणमलने आपल्या वडिलांना "आमचे मृतदेह घेऊन जा" असा धक्कादायक व्हॉट्सॲप मेसेज पाठवला होता. 15 ऑगस्टच्या सकाळी वडिलांनी हा मेसेज पाहिल्यानंतर तात्काळ नौदल नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा चौघांचेही मृतदेह आढळून आले.

Navy Nagar Forensic Investigation : मोबाईल डेटा फॉरमॅट आणि पोलिसांचा तपास

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पुरणमलने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःचा आणि पत्नीचा मोबाईल पूर्णपणे फॉरमॅट केला होता. डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. सध्या कफ परेड पोलीस ठाण्यात पुरणमलविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Navy Nagar Family Dispute : मानसिक अस्वस्थता आणि कौटुंबिक वाद

पुरणमल याच्यावर नौदलाच्या 'INHS अश्विनी' रुग्णालयात उपचार सुरू होते आणि तो आजारी रजेवर होता. कौटुंबिक वाद, आर्थिक तणाव आणि मानसिक आजारपणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही महिन्यांपूर्वी पुरणमलचे वडील आणि सासरे त्याला समजवण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी झालेल्या वादात त्याने पत्नीचा मोबाईल जमिनीवर आदळला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

Navy Nagar Police Statement : आठ जणांचे जबाब नोंदवले

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांचे अधिकृत जबाब नोंदवले आहेत. यामध्ये पुरणमलचा भाऊ, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, घरातील मोलकरीण आणि मित्रांचा समावेश आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget