Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Sanjiv Goenka: संजीव गोएंका जगभरातील अनेक लीगमध्ये संघांचे मालक आहेत. त्यांचा संघ, डर्बन सुपर जायंट्स, दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एकदा अंतिम फेरीत पोहोचला होता.

Sanjiv Goenka team becomes champion: आयपीएलमध्ये खेळाडूंशी वाद घालण्यावरून सातत्याने चर्चेत राहिलेल्या संजीव गोएंकाच्या संघाने इतिहास रचला आहे. द हंड्रेड 2026 च्या अंतिम सामन्यात, मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सला 5 गडी राखून पराभूत केले. मँचेस्टरच्या संघाने द हंड्रेडचे विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंतिम सामन्यात टीम सायफर्टने धुमाकूळ घालत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि आपल्या संघाला एका संस्मरणीय विजयाकडे नेले. मँचेस्टर सुपर जायंट्स संघात संजीव गोएंका यांच्या मालकीच्या आरपीएसजी ग्रुपची 70 टक्के मालकी आहे. मात्र, त्यांच्या लखनौ सुपर जायंट्स या संघाला आयपीएलमध्ये अद्याप यश मिळवता आलेले नाही.
द हंड्रेडचे विजेतेपद पटकावले
द हंड्रेड लीग 2026 चा अंतिम सामना 16 ऑगस्ट रोजी खेळला गेला, ज्यात मँचेस्टर सुपर जायंट्सचा सामना ट्रेंट रॉकेट्सशी झाला. प्रथम फलंदाजी करताना, रॉकेट्सने 100 चेंडूंमध्ये 158 धावा केल्या. जेव्हा मँचेस्टर संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा टीम सायफर्टने 38 चेंडूंमध्ये 72 धावांची धडाकेबाज खेळी करून एमएसजीच्या विजयाचा पाया रचला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकार मारले. जोस बटलर आणि लुस डी प्लोय यांनीही छोट्या खेळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Champions in our very first season! @ManchesterSG100
— Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) August 16, 2026
What a night it has been at Lord's, a proud moment for all of us in the Super Giants family. This was a team effort from the first game to the last. Tim, what an innings. Noor, a brilliant spell with the ball and wickets at… pic.twitter.com/fNOO18Wpfe
मँचेस्टर पहिल्यांदाच चॅम्पियन बनले
संजीव गोएंका मालक झाल्यानंतर एमएसजी (MSG) संघ मैदानात उतरलेला हा पहिलाच हंगाम होता. पूर्वी मँचेस्टर ओरिजिनल्स म्हणून ओळखला जाणारा हा संघ 2022 आणि 2023 मध्ये 'द हंड्रेड'च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. 2022 मध्ये ते ट्रेंट रॉकेट्सकडून आणि पुढच्या वर्षी ओव्हल इन्व्हिन्सिबल्सकडून पराभूत झाले. अखेरीस, सहा हंगामांनंतर पहिल्यांदाच मँचेस्टरच्या पुरुष संघाने यशस्वीपणे ट्रॉफी जिंकली आहे.
जगभरातील अनेक लीगमध्ये संघांचे मालक
संजीव गोएंका जगभरातील अनेक लीगमध्ये संघांचे मालक आहेत. त्यांचा संघ, डर्बन सुपर जायंट्स, दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एकदा अंतिम फेरीत पोहोचला होता. संजीव गोएंका रायझिंग पुणे सुपर जायंट्सचेही मालक होते, जो संघ दोन वर्षे आयपीएलमध्ये खेळला होता. त्यांची इंडियन सुपर लीग फ्रँचायझी, मोहन बागान, 2022-23 हंगामाची चॅम्पियन होती.
इतर महत्वाच्या बातम्या





















