एक्स्प्लोर

मापात पाप! शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ, 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ, शिक्षकाने केला भांडाफोड 

Bhandara News Update : शालेय पोषण आहाराच्या तांदूळ वाटपात घोळ झाल्याचे भंडारा जिल्ह्यात उघड झाले आहे. 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ देण्यात येत होता. एका शिक्षकाने या प्रकाराचा भांडाफोड केलाय.

भंडारा : शालेय पोषण आहारातील तांदूळ वाटपात घोळ केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघड झाला आहे. एका जागृत शिक्षकामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. 50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ भरून तो 50 किलो म्हणून वाटप करण्यात येत होते.  

विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान भोजन दिले जाते. यासाठी लागणारे साहित्य कंत्राटदाराच्या माध्यमातून शाळांना पुरवठा केला जातो. मात्र, आता यामध्ये घोळ होत असल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात समोर आली आहे.  50 किलोच्या पोत्यात 44 किलो तांदूळ भरून तो 50 किलो म्हणून वाटप करण्यात येत होते. परंतु, एका शिक्षकाच्या जागृतपणामुळे या घोटाळ्याचा भांडाफोड झालाय. 

श्रीहरी राईस अँड अग्रो ली गोंदिया यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवनाळा येथे तांदूळ पाठविण्यात आले होते. त्यावेळी येथील सहाय्यक शिक्षक जयसिंग राठोड यांना तांदळाच्या गोणीत तांदूळ कमी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी वजनकाटा लावून मोजण्याची सक्ती केली असता त्यात प्रती कट्टा पाच ते सहा किलो तांदूळ कमी आढळून आले. 

श्रीहरी राईस अँड अग्रो ली गोंदिया यांच्याकडून दिलेल्या बिलानुसार पन्नास किलो सातसे ग्राम वजन अपेक्षित होते. मात्र, त्यातील एकही कट्टा या वजनाचा भरला नाही. या विषयी शाळेतील शिक्षकांनी विचारणा केली असता कमी वजनाचे कट्टे परत गाडीत टाकत नवीन कट्टे देण्यात आले. मात्र, या घटनेमुळे कंत्राटदार तांदूळ वाटपात घोळ करत असल्याचे उघड झाले आहे. 

राज्य आणि केंद्र शासनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिल्लक व उपयोगात आणलेला साठा नोंद करावा लागतो. मात्र, अशाप्रकारे येणारे पोषण आहारचे साहित्याच कमी येत असेल तर स्वयंपाकाचे साहित्य कुठून आणायचे याचा प्रश्न शिक्षकांना पडतो. शिक्षकांनी आलेला स्वयंपाक साहित्य स्वीकारायचा आधी त्याची मोजणी केल्यास ही फसवणूक टाळता येईल. मात्र, अशा पद्धतीने स्वयंपाक साहित्याची अफरातफर  करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही होव्ही अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Nagpur News : स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटीत घोटाळा, शिवशाहीत प्रवाशांना चक्क शून्य पैशांचे तिकीट 

Nagpur Crime : मॅट्रिमोनियल साईटवरुन 15 महिलांना जाळ्यात ओढलं; ठगाला बेड्या, जुगार, सट्ट्यावर उडवायचा पैसे

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget