एक्स्प्लोर

Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका

Bajrang Sonawane On Vilas Ghule Case : पोलीस महासंचालकांचा बीड पोलिसांवर विश्वास नसून त्यांनी सीआयडी तपासाचा आदेश दिला आहे, असं सांगत खासदार बजरंग सोनावणे यांनी संशय व्यक्त केला आहे. 

बीड : विलास घुले हत्या प्रकरणात (Vilas Ghule Case)  जर आपल्या मुलाचा हात असेल, आरोपींच्या सीडीआरमध्ये कुठेही नाव आलं तर त्याला आपण स्वतः पोलीस ठाण्यात आणून सोडतो, अशी भूमिका बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडली. काही आरोपी त्यांचं सरकार असतानाही पळत होते, पण आम्ही कुठेही गुन्हेगार नाही म्हणून उघड माथ्याने फिरतोय, असंही बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले. केज तालुक्यात 20 जून रोजी विलास घुले या युवकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

विलास घुले खून प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्णयाबाबत शंका व्यक्त केली. विलास घुले प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

Bajrang Sonawane Kaij Case : महासंचालकांच्या भूमिकेवर संशय

खासदार बजरंग सोनवणे यांनी विलास घुले खून प्रकरणावरून थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या एका निर्णयाबाबत बाबत शंका उपस्थित केली आहे. विलास घुले खून प्रकरणात सदानंद दातेंकडे सकाळी अर्ज दिला आणि संध्याकाळी सीआयडीची ऑर्डर आली. इतकं आपलं महाराष्ट्र शासन जलद आहे का? बीड पोलिसांनी दोन दिवस तपास केल्यानंतर एसआयटी नेमली. आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. असं असताना सदानंद दातेंचा बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेवर भरवसा नाही का?

Vilas Ghule Case : तपास सीबीआयकडे द्या, सोनावणेंची मागणी 

विलास घुले प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा. जेवढे आरोपी अटक झालेत तेवढ्या आरोपींच्या सीडीआरमध्ये माझ्या मुलाचं कुठं नाव आलं तर मी त्याला स्वतः पोलीस स्टेशनला नेऊन सोडतो. माझा मुलगा काही पळून गेला नाही. तो लपत नाही. एसपी साहेबांनी सांगितल्यानंतरही जवाब का घेतला जातो? असा प्रश्न विचारत या प्रकरणात पोलिसांवर काहीतरी दबाव असल्याचा आरोप यावेळी बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की, "काही आरोपी सरकार असताना, सत्ता असताना पळत होते. आम्ही कुठेही गुन्हेगार नाहीत म्हणून उजळ माथ्याने फिरतोय. काही जणांचं म्हणणं आहे की आरोपी नसला तरी माझ्या मुलाचं नाव या प्रकरणात घेण्यात यावं. अटक करा आणि पुन्हा नंतर त्याला सोडून द्या, असं काहीचं म्हणणं असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पण या प्रकरणात काहीही संबंध नसताना नाव कसं घेणार? हे जमणार नाही."

Beed Crime Vilas Ghule Case : नेमकं काय आहे प्रकरण?

केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणावर आरोपींनी जीवघेणा वार केला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्हा संतप्त झाला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी तब्बल तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तसेच विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी प्रशासनाचा निषेध केला होता. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपासाची चक्रे फिरवत विविध ठिकाणाहून एकूण 9 आरोपींना अटक केली आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Mumbai Cyber Crime News: 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Bailpola: मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम
Gokul Election: 'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget